Rain Update : जूनमध्ये पुणे जिल्ह्यात ९७ टक्के पावसाची नोंद

Rain News : पुणे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांची पावसाची सरासरी ८६१.६ मिलिमीटर एवढी आहे. जून महिन्यात सरासरी १७६.२ मिलिमीटर एवढी आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Pune News : जून महिन्यात दर वर्षी सरासरी १७६.२ मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत १७१.४ मिलिमीटर म्हणजेच ९७.३ टक्के पाऊस पडला असला तरी सरासरीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी त्यात घट झाली असल्याची स्थिती आहे. यंदा वेल्हा मंडलात सर्वाधिक ६३५.२ मिलिमीटर पाऊस पडला असल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

पुणे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांची पावसाची सरासरी ८६१.६ मिलिमीटर एवढी आहे. जून महिन्यात सरासरी १७६.२ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी गेल्या वर्षी ९०.७ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के पाऊस पडला होता.

यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक होता. काही धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता.

Rain Update
Rain Update : खानदेशात अपवाद वगळता सर्वदूर पावसाची हजेरी

यात मुठा खोरे, नीरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. धरणांत सुरवातीला कमी आवक होती. त्यानंतर झालेल्या पावसामुळे चासकमान, कळमोडी, खडकवासला, उजनी अशा काही धरणांत नव्याने पाण्याची आवक झाली आहे.

यंदा हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, जून महिन्यात जवळपास १९ दिवस पाऊस पडलेला आहे. तर ११ दिवस पाऊस पडलेला नाही. मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसास सुरूवात झाली होती. १५ जूनपर्यंत चांगला पाऊस पडला आहे.

यंदा पश्चिमेकडील पट्यांत पावसाचे प्रमाण कमी असले तरी पूर्व भागात पावसाचा जोर अधिक होता. इंदापुरातील सणसर मंडलाची सरासरी १०१.१ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी ४०७.५ मिलिमीटर म्हणजेच ३९९ टक्के पाऊस पडला आहे. दौंड मंडलाची सरासरी ९४.५ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी ३३९ मिलिमीटर म्हणजेच ३५९ टक्के पाऊस पडला आहे.

Rain Update
Maharashtra Rain Update : कोकणात जोरदार सरी, पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या सरी

जिल्ह्यात जून महिन्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस : (मिलिमीटरमध्ये)

हवेली - पुणे वेधशाळा, केशवनगर २२६.६, कोथरूड १२५.२, खडकवासला २४०.१, थेऊर १७७.१, उरुळीकांचन १२७.४, खेड २११.१, भोसरी १५७.४, चिंचवड ७७.२, कळस १४८.१, हडपसर १६१.७, वाघोली १८६.७, अष्टापूर १६२.०

मुळशी - पौड १३०.५, घोटावडे ११८.८, थेरगाव १३९.०, माले १०७.६, मुठे २३५.२, पिरंगुट ७८.४

भोर - भोर १४०.२, भोलावडे, नसरापूर १६९.१, किकवी १३८.६, वेळू ३१०.५, आंबवडे १३५.२, संगमनेर १४७.९, निगुडघर २०१.७

मावळ - वडगाव मावळ १०४.५, तळेगाव १००.१, काले १९०.९, कार्ला ३०९.०, खडकाळा १२२.९, लोणावळा ३५६.८, शिवणे ७८.५,

वेल्हा - वेल्हा ६३५.२, पानशेत २५८.१, विंझर २१३.१, आंबवणे १५३.९

जुन्नर - जुन्नर ३२.१, नारायणगाव १०७.८, वडगाव आनंद १२५.६, निमगाव सावा ५९.४, बेल्हा ९८.८, राजूर ८३.५, डिंगोरे ६९.१, आपटाळे ५३.८, ओतूर ५६.८

खेड - वाडा ६८.१, राजगुरुनगर ९७.२, कुडे ९५.९, पाईट १०४.२, चाकण ७२.८, आळंदी ८८.७, पिंपळगाव ८५.९, कन्हेरसर १०५.४, कडुस ८५.३

आंबेगाव - घोडेगाव ७४.२, आंबेगाव ४३९.०, कळंब १०८.०, पारगाव ६७.६, मंचर ६४.९.

शिरूर - टाकळी ८५.४, वडगाव १४३.१, न्हावरा २२१.२, मलठण १२९.६, तळेगाव १९०.८, रांजणगाव १८१.९, कोरेगाव १०९.३, पाबळ ९१.३, शिरूर १८५.६

बारामती - बारामती २७७.९, माळेगाव १६७.३, पणदरे १५०.२, वडगाव १८१.५, लोणी २४५.७, सुपा २३४.६, मोरगाव २४७.९, उंडवडी २६७.९

इंदापूर - भिगवण २५३.७, इंदापूर २५८.०, लोणी २५६.६, बावडा १८४.८, काटी २२८.२, निमगाव २२८.९, अंथुर्णी १६३.८, सणसर ४०७.५

दौंड - देऊळगाव १४७.६, पाटस ३०४.६, यवत ११२.९, केडगाव १९५.५, राहू १७८.९, वरवंड १९१.५, रावणगाव २४४.७, दौंड ३३९.३, बोरी बु १५४.३, खामगाव १८८.६, वडगाव बांदे १७१.६, पारगाव २२१.२, बोरी पार्धी १८३.५,

पुरंदर - सासवड १६१.७, भिवंडी १०६.५, कुंभारवळण १५३.९, जेजुरी १११.६, परिंचे ८५.२, राजेवाडी १७२.८, वाल्हा ६८.०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com