Koyna Dam : कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Koyna Dam Water Storage : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
Koyna Dam Water Storage
Koyna Dam Water StorageAgrowon

Satara News : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरणाच्या क्षेत्रातील कोयना ७२, नवजा ९७ व महाबळेश्वर १५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद ११,९४३ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळीत वाढू लागली असून एकूण १९.०४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Koyna Dam Water Storage
Rain Update: मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज

गतवर्षी पाऊस कमी झाल्याने कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची मागणी झाल्याने सांगली व सातारा जिल्ह्यांत गावांना पाणी सोडावे लागले होते. मे महिन्यात पाणी सतत विसर्ग सुरू होता. यामुळे पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. जून महिन्यात पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीपातळीच सुधारणा झाली नव्हती.

Koyna Dam Water Storage
Maharashtra Rain Update : कोकणात जोरदार सरी, पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या सरी

मागील दोन ते तीन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठ्यात अल्प प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. सध्या कोयनात सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत एक टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात एकूण २०.०४ तर उपयुक्त १४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

सध्या कोयना धरणातून पूर्ण विसर्ग बंद आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात जास्त पाणसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील धोम, कण्हेर, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी या प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस सुरू आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी जुलै व ऑगस्ट महिन्यातील पाऊस उपयुक्त ठरतो. या महिन्यातील होणाऱ्या पावसावर धरणातील पाणीसाठ्याचे भवितव्य ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com