Fig Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Anjeer Production : पुनरुज्जीवन करून वाढवा अंजिराचे उत्पादन

Fig Farming : जुन्या बागेचे पुनरुज्जीवन केल्यास खर्चात बचत होते. यामुळे उत्पादन वाढून व दर्जाही सुधारतो. कृषी विभागातर्फे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनुदानही जाहीर केले आहे.

Team Agrowon

Saswad News : जुन्या बागेचे पुनरुज्जीवन केल्यास खर्चात बचत होते. यामुळे उत्पादन वाढून व दर्जाही सुधारतो. कृषी विभागातर्फे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनुदानही जाहीर केले आहे. यामुळे शेतकाऱ्यांनी अंजिराच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करावे, असे आवाहन अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ) संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रदीप दळवे केले आहे.

दिवे येथे (ता. पुरंदर) येथे डॉ. दळवे यांनी अंजीर उत्पादकांशी संवाद साधला. प्रगतिशील अंजीर उत्पादक शेतकरी दिलीप जाधव त्यांच्या बागेचे कमी होत चाललेले फळांचे उत्पादन व खालावलेली गुणवत्ता यामुळे त्रस्त झाले होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी परिसरात अखिल भारतीय अंजीर आणि सीताफळ संशोधन प्रकल्पाशी संपर्क साधला.

त्याची पाहणी दळवे यांच्यासह प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, सदर बारा वर्षे झालेल्या बागेतील झाडांच्या फांद्या जीर्ण झाल्यामुळे तसेच इतर फांद्या एकमेकात गुंतल्यामुळे झाडांना सूर्यप्रकाश आणि अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने फळांचा दर्जा खालावलेला होता.

यामुळे बाग पुनश्च उत्पादनक्षम होण्याकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आंबा व पेरू बागेच्या पुनरुज्जीवन शिफारशीप्रमाणे याही बागेचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याचा सल्ला दळवे यांनी जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांना दिला. पुनरुज्जीवनासाठी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन केले. ही कामे डॉ. प्रदीप दळवे, रोगशास्त्रज्ञ डॉ. युवराज बालगुडे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक सुनील नाळे आणि नितीश घोडके यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना योग्य वेळी संपर्क केल्यामुळे जुनी बाग काढून नवीन बाग लावण्याची माझी मानसिकता बदलली. बारा वर्षे जुनी झालेली बाग वाचली असून, पुनरुज्जीवन झाल्याने ती पुन्हा उत्पादनक्षम बनली आहे. यातून माझा वेळ, श्रम व खर्चही वाचला आहे. चालू वर्षी उत्पादन जरी कमी मिळाले असले तरी दर्जा चांगला आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत काढणी हंगाम सुरू राहणार असून पुढील वर्षी या हंगामाच्या दुप्पट उत्पादन मिळेल असा अंदाज आहे.
दिलीप जाधव, अंजीर उत्पादक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT