Water Management : आले पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन

Drip Irrigation : आले पिकाच्या योग्य वाढीसाठी इनलाइन ड्रीप पद्धतीचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी, खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर आणि ड्रीपरचा ताशी प्रवाह तपासावा.
Agriculture Water Management
Agriculture Water ManagementAgrowon

Ginger Crop Water Management : आले पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी हलकी ते मध्यम खोलीची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ५.५ ते ७.५ असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यांयावर असावे.

भुसभुशीत जमीन पिकाच्या योग्य वाढीसाठी उपयुक्त असते. पक्वतेच्या कालावधीत थंड हवामान पोषक ठरते. उगवणीसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस, भरपूर फुटवा होण्यासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस, कंद तयार होण्यासाठी २० ते २५ अंश सेल्सिअस आणि कंद वाढीसाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.

कंद वाढीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून ७५ ते ९० सेंमी रुंद आणि ३० सेंमी उंचीचे वाफे तयार करावेत. दोन गादी वाफ्यातील अंतर ४.५ ते ५ फूट ठेवावे. लागवडीपूर्वी गादी वाफ्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.

एकरी ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ७५ किलो डीएपी, २५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, २० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि ३०० किलो निंबोळी पेंड गादी वाफ्यातील मातीत मिसळून घ्यावी. शक्यतो रासायनिक खतांची मात्रा माती परिक्षण अहवालानुसार द्यावी.

Agriculture Water Management
Water Management : पालखेडचे पाणी येवल्याच्या तलावात

लागवडीसाठी माहिम, रिओ-दी-जानेरो, वरदा, व्ही एन आर, सुप्रभा, कालिकत, मारन आणि मेडक या जातींची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करावी. लागवड १५ जून पर्यंत जोड ओळ पद्धतीने पूर्ण करावी.

दोन ओळीतील अंतर ४० ते ५० सेंमी आणि दोन जोड ओळीतील अंतर ४.५ ते ५ फूट ठेवावे. दोन बेण्यांतील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे.

पाणी व्यवस्थापन

आले पिकाच्या मुळांशी योग्य तितकाच ओलावा असावा. हे पीक ओलाव्याबाबत खूपच संवेदशील आहे. प्रमाणापेक्षा जास्त ओलावा झाल्यास कंदकूज होते.

पाण्याची गरज काढण्याचे सूत्र

पाण्याची गरज (मिमी.) = बाष्पीभवन (मिमी./दिन) × पीक गुणांक × बाष्पपात्र गुणांक

दर एकरी पाण्याची गरज = एकराचे क्षेत्रफळ (चौरस मीटर) × प्रति दिन पाण्याची गरज

उदा. बाष्पीभवन (मिमी./दिन) जर ५ मिमी., पीक गुणांक ०.५, बाष्पपात्र गुणांक जर ०.८ धरला तर एकरी पाण्याची गरज (लिटर/दिन) = ५ × ०.५ × ०.८ × ४००० = ८,००० लिटर.

ठिबक सिंचनाचा वापर

इनलाइन ड्रीप पद्धतीचा वापर करावा. शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी व खते मिळण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक नळीतील अंतर, ड्रीपरमधील अंतर आणि ड्रीपरचा ताशी प्रवाह तपासावा.

जमिनीचा प्रकार हलकी,कमी खोली मध्यम खोली ते जास्त खोली भारी जमीन

ठिबक नळीतील अंतर ४ ते ४.५ फूट ४.५ ते ५ फूट

ड्रीपर मधील अंतर ३० सेंमी ४० सेंमी

ड्रीपरचा ताशी प्रवाह १ लिटर /तास २ लिटर /तास

Agriculture Water Management
Water Management : योग्य नियोजनातून करा पाणीटंचाईवर मात

फायदे

पाणी, अन्नद्रव्ये कार्यक्षम मुळाच्या कक्षेत दिली जातात. पाणी वापरात ५० टक्के आणि रासायनिक खतात ३० टक्के बचत.

जोमदार आणि एकसमान वाढ. जमिनीतील पाणी, अन्न आणि हवा यांचे संतुलन राखता येते.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी सुरू असताना भरणी, फवारणी करता येते.

उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ.

जमिनीचा प्रकार हलकी,कमी खोली मध्यम खोली ते जास्त खोली भारी जमीन

ठिबक नळीतील अंतर ४ ते ४.५ फूट ४.५ ते ५ फूट

ड्रीपर मधील अंतर ३० सेंमी ४० सेंमी

ड्रीपरचा ताशी प्रवाह १ लिटर /तास २ लिटर /तास

पाण्याची गरज

महिना पाण्याची गरज (मिमी. /दिन) पाण्याची गरज (लिटर / एकर/दिन)

मे (लागवड) २.१ ८,४००

जून ३.० १२,०००

जुलै ३.८५ १५,४००

ऑगस्ट ४.५६ १८,२४०

सप्टेंबर ५.५ २२,०००

ऑक्टोबर ५.५ २२,०००

नोव्हेंबर ५.० २०,०००

डिसेंबर ४.३२ १७,२८०

जानेवारी ३.८४ १५,३६०

फेब्रुवारी ३.६४ १४,५६०

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com