Summer Crops  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Agriculture : उन्हाळी मूग, तीळ, ज्वारी लागवडीकडे कल

Summer Crop Update : वर्षानुवर्षे खरिपात घेतली जाणारी मूग, तीळ, ज्वारी ही पिके आता उन्हाळ्यात घेतली जाऊ लागली आहेत. या वर्षी अकोला जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र वाढलेले दिसत आहे.

Team Agrowon

Akola News : वर्षानुवर्षे खरिपात घेतली जाणारी मूग, तीळ, ज्वारी ही पिके आता उन्हाळ्यात घेतली जाऊ लागली आहेत. या वर्षी अकोला जिल्ह्यात या पिकांचे क्षेत्र वाढलेले दिसत आहे. आतापर्यंत पिकांची स्थितीसुद्धा चांगली असल्याने उत्पादनाची अपेक्षा शेतकरी लावून बसलेले आहेत.

खरीप हंगामात घेतले जाणारे मूग, तीळ ही पिके गेल्या काही वर्षात कीड रोग, पावसाच्या तडाख्यात सापडत आहेत. यामुळे या पिकांचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत चालले. याला पर्याय म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर या पिकांची उन्हाळी हंगामात लागवड करू लागले आहेत. भुईमुगापेक्षा पीक कमी कालावधीचे असल्याने तसेच कमी पाण्यात येत असल्याने या पिकाचे उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढत आहे.

यासाठी कृषी विभागाच्या (आत्मा) यंत्रणेमार्फत गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिक व मार्गदर्शनही केले जात आहे. उन्हाळी मूग पिकाचे क्षेत्र वाढत असून त्यापासून शेतकऱ्यांना चांगला दरही मिळतो आहे.

यंदा उन्हाळी हंगामात मोठा बदल दिसत आहे. उन्हाळी ज्वारीचे क्षेत्र दोन हजार एकरापेक्षा जास्त झालेले आहे. उन्हाळी तीळसुद्धा पाचशे एकर, तर मुगाची सहाशे ते सातशे एकरापर्यंत लागवड पोहोचली आहे. ही नवी पीकपद्धती चांगल्यापैकी रुजते आहे. विशेषत: अकोला तालुक्यात कानशिवणी, येळवण, सोनाळा, निपाणा, बोरगाव (मंजू), सुकळी(नंदापूर) गावात मूग लागवड आहे.

उन्हाळी पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच भरपूर सूर्यप्रकाशामुळे पीकसुद्धा चांगले मिळते. मुगासारखे पीक हे द्विदल पीक असल्याने त्याच्या मुळावर गाठी असतात. या गाठीमध्ये ‘रायझोबियम’ हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत जमिनीत स्थिर करतात. जमिनीतील नत्राचा साठा वाढवतात. त्यामुळे जमिनीचा कस वाढण्यासही मदत होते. शेतकऱ्यांना या पिकपद्धतीसाठी आत्मामार्फत मार्गदर्शन, प्रोत्साहन दिले जात आहे.
डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक, आत्मा अकोला
या वर्षी मी आठ एकरांत १० मार्चला मुगाची लागवड केली आहे. दीड एकरांत उडीद पेरलेला आहे. सध्या या पिकात आंतरमशागतीची कामे, निंदण सुरू आहे. येत्या १५ दिवसांत पीक फुलोऱ्यात, शेंगाच्या स्थितीत येईल. दर वर्षी चार क्विंटलपेक्षा अधिक उत्पादकता मिळत आलेली आहे. खरिपाच्या तुलनेत चांगले उत्पादन मिळते, असा अनुभव आहे.
संतोष भीमराव देशमुख, बोरगाव मंजू, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT