Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात यावर्षी चारा मुबलक आहे. चाऱ्याचा दर्जा अतिपावसात घसरला आहे. पण चारा उपलब्ध असून, माळरानातही हिरवळ आहे. चाऱ्याची टंचाई यंदा नसणार कारण, रब्बीही जोमात व हव्या तेवढ्या क्षेत्रात राहील, असे दिसत आहे. .२०२३ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. जळगावातील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, बोदवड, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे, नंदुरबार आदी भागात संकट होते. चाराच नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला होता..शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेला चारा जानेवारीतच संपत आल्याने चाराटंचाईने शेतकरी पशुपालक त्रस्त झाले होते. मागील उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्याचे व चाऱ्यांचे वाढलेले भाव, या विविध कारणांमुळे दुधाळ पशुधनाचा सांभाळ अडचणीचा ठरला होता..Livestock Fodder : खानदेशात चारा मुबलक.काठेवाडी, मेढपाळांनाही दुष्काळाच्या झळा बसल्या होत्या. दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होती. सर्वत्र दुष्काळाचे चटके बसले. चारा व पाण्याची टंचाई भासू लागली होती. जूनमध्येही टँकर होते. त्याला आता गिरणा परिसर देखील अपवाद राहिलेला नव्हता..मागील वेळेसही चांगला पाऊस होता. रब्बी जोमात आला व चाराही पुरेसा होता. यंदाही चारा पुरेसा आहे. रब्बीही जोमात राहील. पण चाऱ्याचा दर्जा पावसाने खराब झाला आहे. निरभ्र वातावरण, उन्हात चाऱ्याची स्थिती सुधारू शकते. माळरानातही हिरवा चारा आहे. रब्बी हंगामातही ज्वारी, मका , बाजरी आदींची पेरणी अपेक्षित क्षेत्रात काही भागात झाली आहे..पेरणी सुरूच आहे. तसेच गहू, हरभरा यांची काडही चारा म्हणून उपलब्ध होईल. खानदेशात अनेक शेतकऱ्यांनी ऊस व केळीची लागवड केली आहे. ही लागवड यंदा वाढली आहे. सर्वत्र हिरवा चारा पुढेही उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे..Green Fodder: हिरवा चारा तयार करा घरच्या शेतात; ज्वारी लागवडीचे सोपे मार्गदर्शन!.चारा दर स्थिरावरणारजळगावातून चाऱ्यास उठाव असतो. अनेकदा धुळे जिल्ह्यातील शिरूड, तरवाडे, मालेगाव व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी घेवून जातात. चारा अन्य भागात देवूनही पुरेसा असतो. यंदा चाऱ्याची पळवापळवी फारशी होणार नाही. पुढे उसाचा चारा उपलब्ध होईल. तसेच कोरडा चाराही राहणार आहे. यामुळे चारा दर स्थिरावतील. चारा दरात कुठलीही वाढ पुढे होणार नाही, अशी स्थिती आहे..पशुधन संख्या कमीअलीकडे पशुधनाचा सांभाळ अनेक जण टाळत आहेत. तसेच २०२३ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. याचा दुधाळ पशुधनाला अधिक फडटका बसला. रोजच्या रोज पशुखाद्याचे व चाऱ्यांचे भाव वाढत होते. आदी कारणांमुळे पशुधनाची संख्या घटली होती. ती अजूनही वाढलेली नाही. ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळ्यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यात फारशी वाढ दिसत नाही, असे सांगितले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.