Summer Sowing Season : उन्हाळी हंगामात चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य

Summer Crop : यंदा राज्यातील बहुतांश भागात टंचाईची स्थिती आहे. मात्र धरणक्षेत्रासह पाणी उपलब्ध असलेल्या भागात उन्हाळी पीक पेरणीत चारा देणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढले आहे.
Maize Fodder
Maize FodderAgrowon

Nagar News : यंदा राज्यातील बहुतांश भागात टंचाईची स्थिती आहे. मात्र धरणक्षेत्रासह पाणी उपलब्ध असलेल्या भागात उन्हाळी पीक पेरणीत चारा देणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा मंगळवारपर्यंत (ता. २६) राज्यात ३ लाख ८ हजार ७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या ८८ टक्के असली तरी गतवर्षीपेक्षा १८ हजार हेक्टरने अधिक आहे.

राज्यात खरीप, रब्बीनंतर पाणी असलेल्या भागात उन्हाळी पिके घेतली जातात. ३ लाख ५९ हजार ७५९ हेक्टर उन्हाळी पिकांचे राज्याचे सरासरी क्षेत्र आहे. गेल्यावर्षी २ लाख ८९ हजार ८१० हेक्टरवर पेरणी झाली होती.

यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रामुख्याने उन्हाळी भाताचे सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उन्हाळी भाताची लागवड झाली आहे.

Maize Fodder
Summer Sowing : उन्हाळी पिकांच्या ६३ टक्के पेरण्या

गतवर्षीपेक्षा १२ हजार हेक्टरने भाताचे क्षेत्र यंदा कमी झाले आहे. राज्यात बहुतांश भागात पाणीटंचाई स्थिती आहे. त्यामुळे मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग या यासारख्या चारा देणाऱ्या पिकांचे पेरणी क्षेत्र वाढले आहे.

उन्हाळी ज्वारीचे बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, नांदेड, बाजरीचे नाशिक, जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, मक्याचे नगर, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सांगली, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, बुलडाणा या जिल्ह्यात क्षेत्र बऱ्यापैकी आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा मक्याचे दोन हजाराने, ज्वारीचे सोळा हजारांनी, बाजरी पाच हजारांनी, तर भुईमुगाचे क्षेत्र १४ हजार हेक्टरने वाढले आहे.

Maize Fodder
Summer Sowing : कमी पावसाचा उन्हाळी पिकांना फटका

तिळाची पेरणी वाढली

राज्यात उन्हाळी हंगामात तिळाची फारशी पेरणी होत नाही. यंदा मात्र त्याची पेरणी वाढली आहे. गेल्यावर्षी उन्हाळी तिळाची ३ हजार ३७८ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ती १३ हजार १३३ हेक्टरवर झाली आहे. यंदा उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र सव्वा तेरा हजार हेक्टरने घटले आहे. मूग, उडदाची पेरणी अल्पच आहे.

उन्हाळी पिकांचे पेरणी क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र हेक्टर)

भात ः १३७४१६ ( ८३१११)

बाजरी ः २८११३ ( २१५६९)

ज्वारी ः २२१०६ ( १२५२३ )

मका ः ३८२१७ ( ५८०१२)

मुग ः ४६६१ ( १२४७७)

उडीद ः ४०६३ ( ४५३)

इतर कडधान्य ः ९७६८ (६९०)

भुईमूग ः ५७७२९ ( ९०६०५ )

सूर्यफूल ः ५७२ (३०७४)

तीळ ः १३१३३ (४९९३)

सोयाबीन ः ३५२८ (२३,३५५)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com