Summer Crop Cultivation : उन्हाळी पिकांच्या लागवडीत मोठी वाढ

Summer Sowing : सध्या सुरू असलेल्या उन्हाळी हंगामात अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक लागवड झाली.
Summer Crop
Summer Crop Agrowon
Published on
Updated on

Akola News : सध्या सुरू असलेल्या उन्हाळी हंगामात अकोला, वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक लागवड झाली. तर बुलडाणा जिल्हा अद्यापही सरासरीपर्यंत पोचलेला नाही. अकोल्यात सुमारे ७३१५, तर वाशीम जिल्ह्यात ७३६७ हेक्टरवर लागवड झाली. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ९८७४ च्या तुलनेत ७८३२ हेक्टरपर्यंत लागवड झालेली आहे.

या वर्षात असमतोल पावसामुळे उन्हाळी हंगामाची प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात बिकट अवस्था झालेली आहे. कमी पावसामुळे प्रकल्प भरलेले नव्हते. खडकपूर्णासारख्या प्रकल्पात मार्चमध्येच एक टक्काही साठा नाही. इतरही प्रकल्पात फारसा साठा तयार झाला नव्हता. शिवाय या असमतोल पावसामुळे पाणी पातळीही वाढू शकली नव्हती. याचा फटका उन्हाळी लागवडीला बसला.

Summer Crop
Summer Sowing : उन्हाळी गळित धान्यांचा १४ हजार ९३३ हेक्टरवर पेरा

परिणामी या जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरीच्या ८० टक्केच लागवड होऊ शकली. यातही भुईमुगाच्या लागवडीत मोठी घट दिसून येत आहे. जिल्ह्यात सरासरी पाच हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत १७६० हेक्टरपर्यंत भुईमुगाची लागवड पोहोचली. गेल्या आठवड्यापर्यंत भुईमुगाची सरासरीच्या ४० टक्केही पेरणी होऊ शकलेली नव्हती. जिल्ह्यात मक्याची २००० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. प्रामुख्याने भुईमुगाच्या लागवडीतील घट चिंताजनक आहे.

Summer Crop
Summer Crop Cultivation : तीन हजार हेक्टरवर ज्वारी, तीळ, बाजरीची लागवड

अकोला, वाशीम जिल्ह्यात उन्हाळी पिकांची लागवड झालेली आहे. अकोल्यात भुईमूग ४५२९ हेक्टरवर पेरणी झाली.तीळ २२५, मूग १२७, मका २५७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. उन्हाळी तिळाचे क्षेत्रसुद्धा २०० हेक्टरवर पोचलेले आहे. मक्याचेही क्षेत्र २६० हेक्टर, मूग १२५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरले गेले आहेत. वाशीम जिल्ह्यातही उन्हाळी लागवडीला वेग आलेला आहे. या जिल्ह्यात उन्हाळी मुगाची लागवड जवळपास १००० हेक्टरपर्यंत गेलेली आहे. भुईमूगही सरासरी २५०० हेक्टरच्या तुलनेत ४००० हेक्टरपर्यंत पोहोचला. उन्हाळी मकाही २०० हेक्टरवर पेरला गेलेला आहे.

कलिंगड शेतीची दखल नाही

उन्हाळी हंगामात अकोला जिल्ह्यात कलिंगड, खरबुजाची लागवड केली जाते. शेकडो हेक्टरवर पेरणी असून त्याची नोंद उन्हाळी पीक लागवडीमध्ये घेतलेली दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com