Summer Crop : भुईमूग, बाजरीसह मका, सोयाबीन पिकांना पसंती

Summer Crop Sowing : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ४२ हजार ८३२ हेक्टरवर आतापर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.
Summer Crop
Summer CropAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या उन्हाळी हंगामात जवळपास ४२ हजार ८३२ हेक्टरवर आतापर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात शेतकऱ्यांनी भुईमूग, मका, सोयाबीन व बाजरीला पसंती दिली आहे.

यंदा उन्हाळी हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्र ३२ हजार ६५८ हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ७५०१ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या २२ टक्के उन्हाळी पिकांची पेरणी झाली. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४,९०३ हेक्टर, जालना जिल्ह्यातील ६५५.३० हेक्टर, बीड जिल्ह्यातील ३७६२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Summer Crop
Summer Crops : तीन जिल्ह्यांत सरासरीच्या १९ टक्केच उन्हाळी पिके

लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३५ हजार ३३१ क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या ४९ टक्के उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ८२० हेक्टर, धाराशिवमधील ९७१ हेक्टर, नांदेडमधील २०२४५ हेक्टर, परभणीतील २१५८ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यातील ११,०३६ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Summer Crop
Summer Crop Cultivation : तीन हजार हेक्टरवर ज्वारी, तीळ, बाजरीची लागवड

उन्हाळी पिकांत ज्वारी, उन्हाळी भुईमुगासह मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, उडीद, मूग, आदी पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थिती (हेक्टर) (स्रोत कृषी विभाग)

मका २०१७

ज्वारी २१३

बाजरी ४३१७

मूग ५

इतर कडधान्य ४३

भुईमूग ७४६

सूर्यफूल ३१

तीळ ७

सोयाबीन १६३

लातूर विभागातील स्थिती (हेक्टर)

मका ४२६७

ज्वारी ६०५५

बाजरी ९७

मूग २२३

उडीद १४३

भुईमूग १८७६९

सूर्यफूल ४३

तीळ ३६१४

सोयाबीन १३७५

इतर गळीतधान्य २

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com