Lumpy Skin Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease : सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’ने १३ जनावरांचा मृत्यू

Animal Disease : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्कीन या आजाराने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्कीन या आजाराने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. खटाव, महाबळेश्वर, पाटण तालुके वगळता जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लम्पीने जिल्ह्यात १३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ५१० जनावरे बाधित आढळून आली आहेत.

सद्य:स्थितीत १३९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या वर्षापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्किनचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले.

या वर्षीही पुन्हा लम्पीचा प्रार्दुभाव वाढला असून, जिल्ह्यात ५१० जनावरे बाधित सापडली आहेत. उपचारानंतर ३५० जनावरे बरी झाली आहेत, तर १३९ जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार सुरू आहेत.

कोरेगाव तालुक्यात २३, सातारा १३, माण दोन, फलटण आठ, खंडाळा ३०, वाई २८, जावळी २६, तर कऱ्हाड तालुक्यात नऊ बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर खंडाळा सात, कोरेगाव चार, वाई एक, जावळी एक जनावरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT