Lumpy Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात 'लम्पी'चा प्रार्दुभाव वाढला, चार जनावरांचा मृत्यू

Lumpy Skin Disease : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून लम्पी रोगाचा प्रार्दुभाव वाढला आहे.
Lumpy Kolhapur
Lumpy Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून लम्पी रोगाचा प्रार्दुभाव वाढला आहे. राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे लम्पी आजाराने चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण, औषधे फवारणी करण्यात आली. याचबरोबर ग्रामस्थांनी जनावरे खरेदी-विक्री करू नये, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

राधानगरी तालुक्यातील अनेक गावांत लम्पीचा संसर्ग वाढला आहे. तालुक्यातील महत्वाचे असणाऱ्या राशिवडे गावात अनेक जनावरांना 'लम्पी'ची लागण झाली आहे. यावर पशु संवर्धन विभागाकडून योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या यामुळे लम्पीचा संसर्ग काही अंशी कमी झाला होता. परंतु, काही दिवसांनी पुन्हा अनेक जनावरांना लागण झाली.

यामध्ये बैलांसह गायींचाही समावेश आहे. .यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली आहेत. जवळपास ३० ते ४० जनावरे आढळल्याची माहिती समोर आली आहे.

Lumpy Kolhapur
Almatti Koyna Dam Level : कोल्हापूर, सांगलीला महापुराचा फटका बसणार का ? कोयना, चांदोली आणि अलमट्टी धरणांच्या पाणीपातळीत वाढ

यानंतर आता राधानगरी तालुक्यात याचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत लसीकरणाची मोहिम राबवण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत दिड लाखांच्या आसपास डोस जिल्ह्यात पुरविण्यात आले आहेत.

यादृष्टीने ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव आहे तेथून जवळपास ५ किमीपर्यंत जनावरांचे पहिल्यांदा लसीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. आपल्या जनावरांना कोणताही त्रास होत असल्यास जिल्ह्यातील पशुपालकांनी ताबडतोब आरोग्य केंद्रात माहिती द्यावी.

यामुळे त्या पशुपालकाच्या जनावरांना योग्य तो उपचार पोहोचण्यास मदत होणार आहे. दरम्यान लम्पीची साथ आली आहे परंतु मागच्या वेळीसारखी त्याची तीव्रता कमी आहे. यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com