Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : पाच जिल्ह्यांत अपेक्षित क्षेत्रावर उन्हाळी पेरणी नाही

Sowing Update : पाणीटंचाईच्या वाढत्या झळा, वाढती उन्हाची तीव्रता यामुळे आजवर अपेक्षित पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत यंदाच्या उन्हाळी हंगामात आतापर्यंत अपेक्षित क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली नाही. पाणीटंचाईच्या वाढत्या झळा, वाढती उन्हाची तीव्रता यामुळे आजवर अपेक्षित पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे.

लातूर कृषी विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर इतके आहे. त्यामध्ये लातूरमधील २३९६, धाराशिवमधील ९५५५, नांदेडमधील २२४१, परभणीतील १० हजार ९५८, हिंगोलीतील २६ हजार ३४८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

या क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात ४८ हजार २२२ हेक्टर म्हणजे ६७.२६ टक्के क्षेत्रावर ऊस पीक वगळून उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. ही पेरणी करताना उन्हाळी भुईमुगाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. पाचही जिल्ह्यांत उन्हाळी भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असताना प्रत्यक्षात २२ हजार ८९५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ८६.७६ टक्के क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली आहे.

भुईमुगाचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. उन्हाळी मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ८०५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६७६० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मक्याची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८३ टक्के इतकी आहे. उन्हाळी मक्याचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.

याशिवाय उन्हाळी ज्वारी १० हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरली गेली आहे. १८९ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, ४५८ हेक्टर क्षेत्रावर मूग, १६७ हेक्टर क्षेत्रावर उडीद, ८६ हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूल, ४२५५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी तीळ, २६९२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन, तर ५१ एकर क्षेत्रावर इतर गळीत धान्याची पेरणी करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

जिल्हानिहाय उन्हाळी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

उन्हाळी पेरणीक्षेत्र

लातूर १६७०

धाराशिव १७२

नांदेड २७ हजार ५४४

परभणी ५ हजार३२२

हिंगोली ११ हजार ९५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

SCROLL FOR NEXT