Summer Sowing : तीन जिल्ह्यांत १९ हजार ८६७ हेक्टरवर उन्हाळी पेरणी

Sowing Update : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी ३२ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १९ हजार ८६७.५० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.
Summer Sowing
Summer SowingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : येथील विभागीय कृषी शासन संचालक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी ३२ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १९ हजार ८६७.५० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. पिकांची पेरणी करताना शेतकऱ्यांनी बाजरीच्या पेरणीला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. याशिवाय काही भागांत मका पिकाची जनावराच्या चाऱ्यासाठी म्हणून पेरणी करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ९०३ हेक्टर असून, आतापर्यंत प्रत्यक्षात ९६३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या पेरणीमध्ये उन्हाळी मका सरासरी ५८०२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३७२९ हेक्टरवर पेरली गेली आहे. उन्हाळी बाजरीचे सरासरी क्षेत्र ४९२९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५१०६ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे.

Summer Sowing
Summer Sowing : उन्हाळी कडधान्यांची ४३८ हेक्टरवर पेरणी

भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ११७५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३६०.५० हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाची सरासरी क्षेत्र ३८२ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७४ हेक्टर क्षेत्रावरच सूर्यफुलाची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र १९७ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ १५.४० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

जालना जिल्हा

जालना जिल्ह्याचे उन्हाळी हंगामाचे क्षेत्र १० हजार २९८ हेक्टर असताना प्रत्यक्षात २५७८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. ही पेरणी करताना उन्हाळी मका पिकाची सर्वसाधारण ४३०४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७९६ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. उन्हाळी बाजरीची ९७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Summer Sowing
Summer Bajara Sowing : पुणे जिल्ह्यात उन्हाळी बाजरीची दोन हजार हेक्टरवर पेरणी

भुईमुगाचे सरासरी क्षेत्र १०७४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४१७ हेक्टर क्षेत्रावर भुईमुगाची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ६९६ हेक्टर असताना प्रत्यक्षात २०३.४० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सूर्यफुलाची१७.८० सूर्यफुलाची पेरणी झाली आहे.

बीड जिल्हा

बीड जिल्ह्याचे उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र ७४५५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७६५२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत थोडी जास्त आहे. ही पेरणी करताना सरासरी १२६७ हेक्टर मका क्षेत्राच्या तुलनेत ८७४ हेक्टर क्षेत्रावर मकाची पेरणी झाली आहे. हे मकाचे पीक जनावरासाठी चारा म्हणून वापरले जात आहे.

बाजरीचे पीक दाणे भरण्याचे ते पक्वतेच्या अवस्थेत आहे. भुईमुगाची सरासरी क्षेत्र २११७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७१८ हेक्टरवरच भुईमुगाची पेरणी झाली आहे. भुईमुगाचे पीक शेंगा लागण्याच्या ते पोसण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनची ६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे पीक फुले लागण्याच्या ते आरा सुटण्याच्या अवस्थेत आहे. इतर पिकांची ही जवळपास १११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com