Summer Sowing : कोल्हापुरात उन्हाळी हंगामाचे क्षेत्र अडीच हजार हेक्टरनी घटले

Summer Sowing Update : यंदा उन्हाळी हंगामात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र घटले असून, फक्त दोन हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
Summer Sowing
Summer SowingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : गेल्या पावसाळ्यात पाऊसमान कमी राहिले, तसेच परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी यावर्षीच्या तिन्ही हंगामांवर पिकांच्या वाढीवर परिणाम दिसून आला आहे. यंदा उन्हाळी हंगामात सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र घटले असून, फक्त दोन हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही तालुक्यांत तुरळक ठिकाणी वळीव पडला असला तरी शेतकऱ्यांना आता मोठ्या वळीव पावसाची प्रतीक्षा आहे.

Summer Sowing
Summer Sowing : तीन जिल्ह्यांत १९ हजार ८६७ हेक्टरवर उन्हाळी पेरणी

जिल्ह्यात गतवर्षी पावसाळ्यात फक्त ५० टक्केच पाऊस झाला. यामुळे पावसाळा, हिवाळा तसेच उन्हाळा हंगाम शेतकऱ्यांना अडचणीचा ठरला आहे. जिल्ह्यात जानेवारी ते मे उन्हाळी हंगामात पिके घेतली जातात. जिल्ह्यात उन्हाळी हंगामाचे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र असते. गतवेळी पाऊसमान कमी राहिले, यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नदीत पाणी असताना उपसाबंदी केली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना ताण पडून पाणी द्यावे लागत आहे. परिणामी उत्पादन घटणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात भुईमूग १६९० हेक्टर, भात २२५ हेक्टर, सूर्यफूल दीडशे हेक्टर, सोयाबीन ६५ हेक्टर असे सुमारे दोन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आता पेरणीचा हंगाम संपला असून, उन्हाळी हंगामाचे सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. उपसा बंदीमुळे पिकाला ताण पडून पाणी द्यावे लागत आहे. यामुळे भुईमुगाचे उत्पादन घटेल असे चित्र आहे.

Summer Sowing
Summer Bajara Sowing : पुणे जिल्ह्यात उन्हाळी बाजरीची दोन हजार हेक्टरवर पेरणी

दोन दिवसांपूर्वी आजरा तालुक्यात सहा मंडलांमध्ये, चंदगडमध्ये दोन मंडलांमध्ये, करवीर तालुक्यात दोन मंडलांमध्ये, पन्हाळा तालुक्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी वळीव पाऊस झाला. उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याचे फेर पिकांना वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. उसाच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एखाद्या वळीव पावसाची प्रतीक्षा आहे.

पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक आच्छादन व पाचट आच्छादन करून पिके घ्यावीत, भाजीपाला करावा. चारा टंचाई पाहता चारा पिके घ्यावीत. मुरघास तयार करावा.
अरुण भिंगारदिवे, प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक
उन्हाच्या कडाक्यामुले पिकांना पाण्यासाठी ताण पडत आहे. दोन एकर उसाच्या क्षेत्रात पाचट आच्छादन केले आहे. त्यामुळे पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. यापुढे शेतकऱ्यांनी खोडवा पिकाला १०० टक्के पाचट अच्छादन करणे काळाची गरज आहे.
तानाजी मोरे, प्रगतिशील शेतकरी, कोगे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com