Vasubaras  Agrowon
ॲग्रो विशेष

Importance of Indigenous Cow : बदलत्या हवामान परिस्थितीत देशी गायींचे महत्त्व अनन्यसाधारण

Vasubaras Festival : कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये वसुबारसेचा सण पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Agrowon

Pune News : कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये वसुबारसेचा सण पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या उपस्थितीत गोपूजन करण्यात आले.

या वेळी कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की सध्याच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत देशी गाईंना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत देशी गोवंशाचे संगोपन, संवर्धन करणे आवश्यक आहे. देशी गोपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत व फायदेशीर उत्पादनाचा स्रोत निर्माण होईल.

गोपूजन कार्यक्रमावेळी माजी कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. व्यंकटराव मायंदे, डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले तसेच फुलोत्पादन संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील,

माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर आणि देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने आणि विद्यापीठातील तज्ज्ञ उपस्थित होते.

या वेळी प्रमुख पाहुण्यांनी गायींचे गोठे, गोपरिक्रमा, स्वयंचलित वातावरण नियंत्रित गोठा, फुले स्मार्ट हवामान केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प, गोबर गॅस संयंत्र आणि दुग्ध प्रक्रिया प्रयोगशाळेला भेट दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT