Indigenous Cows Conservation : देशी गाईंची उपयुक्तता जाणून करुया संवर्धन

Usefulness of Cows : देशी गाईंच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने त्यांना राज्यमातेचा दर्जा दिला आहे. यासाठी देशी गाईंच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच शेण-गोमूत्राचे महत्त्व लक्षात घेतले गेले. राज्यमाता देशी गाईंचे संवर्धन त्यांचे महत्त्व सर्वसामान्यांना पटल्याशिवाय होणार नाही, म्हणूनच हा लेख प्रपंच!
Cows Conservation
Cows ConservationAgrowon
Published on
Updated on

डॉ भास्कर गायकवाड

Desi Cow : गायीला सर्व जगाची पालनहार म्हटले जाते, कारण ती मानवाला अन्न देते. जमिनीला शेणाद्वारे अन्न मिळाल्याने सकस पीक उत्पादन हाती येते. या पिकावर सर्व सृष्टीचे जीवन अवलंबून असते. गायीच्या शरीरात सर्व देव- देवतांचे वास्तव्य असल्याची आपली धर्मधारणा आहे. म्हणूनच गायीचे दर्शन घेतले तर ३३ कोटी देवांचे दर्शन घेतल्याचे समाधान मिळते.

हिंदू संस्कृतीमध्ये माणसाचा जन्म झाल्यापासून ते मृत्यूनंतरच्याही अनेक विधींमध्ये गायीपासून मिळालेले दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र यांचा वापर केला जातो- यालाच ‘पंचगव्य’ असे म्हटले जाते. गायीच्या मणक्यातून जाणाऱ्या सूर्यकेतू नाडीद्वारे सूर्यकिरणे शोषून घेतली जातात. याद्वारे गायीच्या शरीरात सुवर्ण खनिजाची निर्मिती होते.

गायीपासून मिळालेल्या या पंचगव्यामध्ये सुवर्णाचा अंश राहतो म्हणून पंचगव्याचा वापर केला तर मानवाच्या अनेक व्याधी कमी होण्यास मदत होते. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी यासारखीच उपचार पद्धती म्हणजे पंचगव्य. त्याचा वापर माणसाला व्याधीमुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जातो.

गायीच्या दुधात सुवर्ण खनिजाचा अंश असल्यामुळे त्याचा रंग थोडासा पिवळसर असतो. यापासून बनविलेले तूप व इतरही पदार्थांना पिवळसर छटा असते. गायीच्या दुधाला अमृत म्हटले जाते. कारण या दुधाच्या सेवनामुळे अशक्त- रोगी मनुष्य सशक्त आणि निरोगी होतो. बाळाला आईच्या दुधानंतर गायीचे दूध दिले जाते.

गायीच्या दुधात सहा प्रकारची जीवनसत्त्वे, आठ प्रकारची प्रथिने, २५ प्रकारची खनिजे, २१ प्रकारची अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स, चार प्रकारची फॉस्फेरिक अ‍ॅसिड्स आणि दोन प्रकारचे ग्लुकोज असतात. गायीच्या दुधात सायटोकाईन मुबलक प्रमाणात असते.

तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम यांचे २:१ या प्रमाणात संतुलन असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीर संतुलित राहते. शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. गायीच्या दुधाला पूर्णान्न म्हटले जाते.

Cows Conservation
Desi Cow Conservation : देशी गो संवर्धनासाठी आधुनिकतेची जोड गरजेची

मनुष्याच्या अनेक व्याधी दूर करण्यासाठी गायीच्या तुपाचा वापर केला जातो. तुपाचे सेवन केल्यामुळे दृष्टी सुधारते. पचनक्रिया चांगली राहून आरोग्य उत्तम राहते. शरीरातील वात, पित्त, कफ नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मेंदूची कार्यक्षमता वाढते. तुपाचे सेवन करताना एक वेगळा गंध येतो. हे तूप पाचक असते. अनेक वेळा शुभकार्य, संकट निवारण तसेच इच्छापूर्तीसाठी यज्ञ- होमहवन केले जाते. यामध्ये गायीच्या तुपाचा वापर केला जातो. १० ग्रॅम तूप जाळले तर एक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. होमहवनामध्ये तूप आणि तांदूळ एकत्र जाळले जातात.

यातून इथॅलिन ऑक्साइड आणि फॉर्मल्डिंहाईड  तयार होते. यामुळे निसर्गातील घातक जिवाणूंचा नाश होतो. होमहवनामध्ये तूप, तांदूळ जाळले तर प्रोपिलिन ऑक्साइड तयार होते जे ढगातील पाणी पाऊस स्वरूपात परिवर्तित होण्यासाठी प्रवृत्त करते.

मानवी आरोग्यामध्ये गायीच्या दुधापासून बनविलेले दही तसेच दह्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांना अत्यंत महत्त्व आहे. कारण त्यामुळे आरोग्य संपदा उत्तम राहते. दही, ताकाचे सेवन केल्यामुळे पोटातील घातक जिवाणूंचा नाश होतो तर पाचक जिवाणूंची वाढ होते. यामुळे पचनक्रिया सुधारते.

पचनक्रिया चांगली राहिली तर आरोग्य चांगले राहते. शरीरातील उष्णता वाढली असता दह्यापासून बनवलेले ताक, लस्सी यांचा वापर केला तर शरीरातील दाह कमी होऊन अनेक व्याधी कमी होण्यास मदत होते. दह्याचे सेवन केल्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते. अर्धांगवायूसारख्या समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.

Cows Conservation
Indigenous Cow Conservation : देशी गाय संवर्धनासाठी गोशाळांना अनुदान

गोमूत्राला गंगाजलासमान महत्त्व दिल्यामुळे अनेक वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी गोमूत्र शिंपडण्याची रूढी परंपरा आहे. सुतक, विटाळ किंवा वाईट घटना घडल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडले जाते. गोमूत्रामध्ये पोटॅशिअम, सोडिअम, नायट्रोजन, फॉस्फरस, युरिक अ‍ॅसिड, कॉपर यांचे मुबलक प्रमाण असल्यामुळे मानवाच्या अनेक व्याधी कमी करण्यासाठी याचा वापर होतो.

गोमूत्रामुळे पिकाला अन्नद्रव्ये मिळतात तसेच त्याच्या फवारणीमुळे पिकावरील अनेक रोगांचा नाश होऊन चांगले उत्पादन मिळते. गोमूत्रामध्ये जिवाणू- बुरशी प्रतिरोधक गुणधर्म, कॅन्सर प्रतिरोधक गुणधर्म आहेत. गोमूत्राच्या सेवनामुळे प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यात मदत होते.

गोमूत्रामध्ये कॉपर असल्यामुळे शरीरातील घातक द्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते. शरीरात वाढलेले अतिरिक्त त्रिदोष कमी झाल्यामुळे अनेक विकारांपासून मुक्तता मिळते.

गायीचे शेण जिवाणू- विषाणू आणि बुरशीरोधक असल्यामुळे गायीच्या शेणाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. गायीच्या शेणाने घर सारवले तर घरातील घातक जिवाणूंचा नाश होतो. गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्यांवर तूप टाकून ते घरात जाळले तर घरातील हवा शुद्ध होऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

त्यामुळे मानवी आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या अनेक धार्मिक विधींमध्ये जाळल्या जातात. यामुळे त्यांना देश-विदेशात मोठी मागणी आहे.जमिनीमध्ये शेणखताचा वापर केल्यामुळे जमिनीला अन्नद्रव्ये मिळतात. यामुळे पिकाची निरोगी- सशक्त वाढ होऊन मानव- तसेच इतर सजीवांना निरोगी अन्न-धान्य, आहार, फळे- भाजीपाला मिळतो.

बॉस इंडिकस म्हणजे भारतीय गाय - जिला खांदा आणि शिंगे असतात. या दूध उत्पादन आणि शेती वाहतुकीच्या कामाला चांगल्या असतात. टॉरस म्हणजे विदेशी गाय. दूध आणि मांस उत्पादनासाठी वापरली जाते. या गायीला खांदा नसतो. आपल्याकडे धवलक्रांती म्हणजेच दुधाची क्रांती झाली त्यावेळी या गायी आपल्या देशामध्ये विदेशी गायी आणून त्यांचे देशी गायीबरोबर संकर घडवून या जर्सी गायी झाल्या. या दूध जास्त देतात. परंतु यांच्या दुधाचा गुणधर्म देशी गायीसारखा नाही.

भारतातील ८० पैकी ५७ नामांकित देशी गायींच्या जाती नामशेष झाल्या आहेत. ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांनी ८०-९० वर्षांपूर्वी आपल्या गीर, साहिवाल, अंगोल, कांकरेज या जाती त्यांच्या देशात नेऊन तेथील त्यांच्या गायीची गुणप्रत वाढविली. ‘तुज आहे तुज पासी परी तू विसरलासी’ अशी गत आपली झाली आहे. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही.

आपल्या कडील गोधनाचे योग्य पद्धतीने संवर्धन आणि संगोपन केले तर या गोमातेपासून मिळणाऱ्या पंचगव्याचा वापर करून देशातील सर्व सामान्यांचे आरोग्य संपन्न होईल. अर्थात यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून आपले योगदान देणे गरजेचे आहे.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com