Kharif Sowing 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Supply : खरीप पिकांच्या ४८ हजार ४२७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

Kharif Sowing : हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये विविध पिकांची ३ लाख ५४ हजार ४५५ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे.

Team Agrowon

Hingoli News : जिल्ह्यात विविध खरीप पिकांच्या ४८ हजार ४२७ क्विंटल बियाण्याचा तसेच कपाशीच्या ९८ हजार ८४८ बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला. त्यापैकी ४१ हजार २०१ क्विंटल बियाणे तसेच कपाशी बियाण्याच्या ७२ हजार ७०२ पाकिटांची विकी झाली अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये विविध पिकांची ३ लाख ५४ हजार ४५५ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील (महाबीज) बियाणे उत्पादकांकडे ७ हजार ८१९ क्विंटल आणि खाजगी बियाणे कंपन्यांकडे ६७ हजार ६७१ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली.

सोमवार (ता. १६) अखेरपर्यंत सोयाबीनच्या ७३ हजार २९३ पैकी ४६ हजार ७२४ क्विंटल, तुरीच्या १ हजार ६७९ पैकी १ हजार २७३ क्विंटल, मुगाच्या १८३ क्विंटल उडदाच्या २२२ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. ज्वारीच्या १६८ पैकी १५ क्विंटल, बाजरीच्या २ क्विंटल, भाताच्या २ क्विंटल मक्याच्या ३६.५९ पैकी ५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. तिळाच्या १ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे.

४१ हजार २०१ क्विंटल बियाण्याची विक्री

सोयाबीनच्या ४० हजार १७० क्विंटल,तुरीच्या ७९१ क्विंटल, मुगाच्या १०४ क्विंटल, उडीद १३२ क्विंटल, मका ५० किलो, ज्वारीचे २.५ क्विंटल बियाणे मिळून एकूण ४१ हजार २०१ क्विंटल बियाण्याची विक्री झाली. ७ हजार २२६ क्विंटल बियाणे शिल्लक होते.

कपाशी बियाण्याच्या ७२ हजारावर पाकिटे विक्री...

यंदा कपाशीची ३० हजार ४०० हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी विविध वाणांच्या १ लाख ५२ हजार बियाणे पाकिटांची मागणी खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे. आजवर ९८ हजार ८४८ बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला त्यापैकी ७२हजार ७०२ पाकिटांची विक्री झाली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Compensation: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत ऐंशी जणांना मदत

Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गे होण्यासाठी आंदोलनाचा निर्णय

Fertilizer Management: माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे

Sugarcane Farmer Issue: उसाला तुरे आल्याने शेतकरी चिंतेत

Agriculture Storage Subsidy: कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी शासन देणार अनुदान

SCROLL FOR NEXT