Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : गेल्या बावीस दिवसांत ५७ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : गेल्या २२ दिवसांत तब्बल ५७ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीने दीड हजार हेक्टरला फटका बसला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : गेल्या २२ दिवसांत तब्बल ५७ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीने दीड हजार हेक्टरला फटका बसला आहे. बाभूळगाव तालुक्यात सर्वाधिक ४०० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे.

एक जुलैपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एक ते २२ जुलैदरम्यान ४५० मिमी पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांत संततधार कायम राहिली. याचा फटका पिकांना बसला आहे. कापूस, तूर, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यातील पावसाने दीड हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

पावसाने ७७ गावांतील पिकांना मोठा फटका बसला आहे. यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक ७५१ हेक्टरचे आहे. सोयाबीन ५३७, तूर २०९ हेक्टर पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५०.२० मिमी पावसाची नोंद झाली असून ४८.५८ टक्के पाऊस झाला आहे. ५७ मंडलांत अतिवृष्टी झाली असून, पंचनामे सुरू होण्याविषयी संभ्रम आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

अनेक शेतकऱ्यांना गेल्यावर्षीची नुकसानीची मदत अजूनही मिळालेली नाही. अशातच पुन्हा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. बाभूळगाव तालुक्यात ४०९ हेक्टरला फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT