Pune Rain Update : लोणावळा, कार्ल्यात सर्वाधिक २०९ मिलिमीटर पावसाची नोंद

Latest Rain News : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यांतील काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे. प्रामुख्याने पश्चिम भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यांतील काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे. प्रामुख्याने पश्चिम भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. लोणावळा, कार्ल्यांत सर्वाधिक २०९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत.

सध्या पावसासाठी पोषक वातावरण असल्याने मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. त्यामुळे पश्चिम भागातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यात अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. या पावसामुळे भात खाचरे भरून वाहू लागली आहेत. भात लागवडी वेगात सुरू आहेत.

Rain
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढणार

मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यांतील सर्व धरणे मिळून एकूण नव्याने ४.३२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठा ३६.२४ टीएमसी म्हणजेच १८ टक्क्यांवर गेला आहे.

मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. टेमघर धरणक्षेत्रात १०५ मिलिमीटर पाऊस पडला. तर वरसगाव ८५, पानशेत ९१, खडकवासला ५० मिलिमीटर पाऊस पडला.

निरा खोऱ्यातील वडीवळे धरण क्षेत्रात १५० मिलिमीटर, पवना १३२ मिलिमीटर, कळमोडी ६०, चासकमान ४०, कासारसाई ३२, आंध्रा ३२, गुंजवणी ९५, निरा देवघर ५८, भाटघर २९ मिलिमीटर पाऊस पडला. तर वीर, नाझरे धरणक्षेत्रात हलक्या सरी बरसल्या.

कुकडी खोऱ्यांतील डिंभे धरण क्षेत्रात ४३ मिलिमीटर, माणिकडोह २७, पिंपळगाव जोगे २१, येडगाव २२, चिल्हेवाडी १६ मिलिमीटर पाऊस पडला. मुळशी धरण क्षेत्रात १८४ मिलिमीटर पाऊस झाला असून वळवण घोटमाथ्यावर १७३, लोणावळा १९३, कुंडली १३३, शिरोटा १३७, ठोकरवाडी ९२ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain
Rain Update : सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात

पूर्व भागात पावसाच्या हलक्या सरी

जिल्ह्याच्या जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात पावसाच्या अनेक ठिकाणी हलक्या बरसल्या. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला असून पिके तरारली आहेत.

हवेलीतील थेऊर, उरूळी काचंन, कळस, वाघोली, अष्टापूर मंडलात तुरळक पाऊस पडला. शिरूरमधील पाबळ मंडलात २४.३ मिलिमीटर, बारामतीतील वडगाव मंडलात १८, पुरंदरमधील सासवड मंडलात २०.३, भिवंडी ११, कुंभारवळण १७.५, परिंचे १५, वाल्हा मंडलात ११.५ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची मंडले : स्रोत-कृषी विभाग

हवेली - पुणे वेधशाळा ३२.८, केशवनगर ३२.८, कोथरूड ७१, खडकवासला ३२.८, खेड शिवापूर ४०, भोसरी ८.८, चिंचवड १२.५, हडपसर २०.३

मुळशी - पौड, घोटावडे ६६.८, थेरगाव २४.०, माले १०९.८, मुठे १०९.८, पिरंगुट ७१

भोर - भोर २१.५, भोलावडे ४६.३, नसरापूर २७, किकवी २२.५, वेळू ३४.८, आंबवडे ३२, संगमनेर २१.५, निगुडघर ६३.३

मावळ - वडगाव मावळ ५२.३, तळेगाव ३३, काले ९९.५, कार्ला २०९.५, खडकाळा १०१.५, लोणावळा २०९.५, शिवणे ९०

वेल्हा - वेल्हा १४७.८, पानशेत १३३, विंझर ७०.५, आंबवणे ३५.८

जुन्नर - जुन्नर २३.८, नारायणगाव १६.३, वडगाव आनंद १२.३, निमगाव सावा १२.३, बेल्हा ११.५, राजूर ३१.८, डिंगोरे ३१.८, आपटाळे ३१.८, ओतूर १५.३

खेड - वाडा ३४.८, राजगुरुनगर २०, कुडे २२.३, पाईट ५२.३, चाकण २८.३, पिंपळगाव १२.३, कन्हेरसर २४, कडुस २७

आंबेगाव - घोडेगाव १८.३, आंबेगाव १२५.८, कळंब १२.३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com