Kolhapur Monsoon 2024
Kolhapur Monsoon 2024Agrowon

Kolhapur Rain : कोल्हापुरात नद्यांच्या पाण्याने शिवार व्‍यापले

Panchaganga River : पावसाचा जोर कायम, ‘पंचगंगा’ पात्र तोडून बाहेर; धरणांतून विसर्ग शक्य
Published on

Kolhapur Rain News : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाण्यात बुधवारी (ता. २४) दुपारपर्यंत वेगवान वाढ सुरू होती. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील मोठ्या धरणांचे पाणी नदीपात्रांमध्ये येण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ४२ फूट ५ इंच इतकी होती. या ठिकाणी धोकापातळी ४३ फूट असल्याने कोणत्याही क्षणी पाणी धोका पातळीवरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस कायम असल्याने नद्यांच्या पाण्यात वाढ होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत राधानगरी धरण ९४ टक्के भरले होते. दूधगंगा धरणांतूनही पुढील चोवीस तासांत पाणी सोडण्‍याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

वारणा धरणांतूनही ८८७४ क्युसेक पाणी सोडण्‍यात येत असल्याने पंचगंगेसह वारणा, कृष्णा नद्यांचे पाणीही शिवारात पसरत आहे. सध्या विविध नद्यांवरील ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात नदी काठानजीक असणाऱ्या ठिकाणचे स्थलांतर सुरू करण्‍यात आले आहे.

Kolhapur Monsoon 2024
Heavy Rain: कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ सुरूच

धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्‍याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने ग्रामस्‍थांना सावध राहण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. दरम्‍यान, कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही बुधवारी सकाळपासून २ लाख क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरणातील पाणी आवक वाढत असल्याने मंगळवारी (ता. २३) कर्नाटकातील संबंधित विभागाची बैठक रात्री झाली. यामध्ये अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी (२३) रात्री साडेनऊ वाजता दीड लाख क्युसेक वरून तो १ लाख ७० हजार क्युसेक विसर्ग सुरू केला. तसेच कर्नाटकातील शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तिथल्या सिंचन योजना सुरू करण्याबाबतही या बैठकीत चर्चाही करण्यात आली.

तसेच या बाबत पाटबंधारे विभागानेही सहमती दर्शविली असून, सिंचन योजना सुरू करण्याचे नियोजनही केले असल्याचे सांगण्यात आले आहे. अलमट्टी धरणात बुधवारी (ता. २४) १ लाख ७० हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजता १ लाख ७० हजार क्युसेकवरून २ लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com