Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : जोरदार पावसाचा पिकांना दणका

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात झरी (ता.पाथरी) येथे वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. खरीप पिकांसाठी परतीचा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. सोयाबीन काढणीचा खोळंबा झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलात मंगळवारी (ता. २४) दुपारनंतर विजांच्या कडकडाट पाऊस झाला. परभणी, मानवत, गंगाखेड तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. मंगळवारी (ता. २४) दुपारी झरी (ता. पाथरी) शिवारात वीज कोसळून

डिंगाबर सत्वधर (वय २९) आणि सालगडी संतोष झामरे (वय २९) यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी १७.३ मिमी तर सप्टेंबर महिन्यात आजवर सरासरी २४९.९ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर ८०९.३ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ७.३ मिलिमीटर तर सप्टेंबर महिन्यात २९७.६ मिमी पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर एकूण सरासरी ८७३.२ मिलीमीटर पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)

परभणी जिल्हा ः परभणी शहर २२, परभणी ग्रामीण ५५, पेडगाव २६.३, जां ब २४.३, झरी १८.८, सिंगणापूर ५८.३, दैठणा ४६, पिंगळी ५५, टाकळी कुंभकर्ण १३, वालूर १५, मानवत ३८.३, केकरजवळा ३७.३, कोल्हा २३.५, ताडबोरगाव २५.५, रामपुरी १०.८, पाथरी २३, बाभळगाव १७.५, हादगाव ११.३, कासापुरी १५.८, सोनपेठ१३, शेळगाव ११.३, वडगाव १८, गंगाखेड ३२.८, महातपुरी १०.५, माखणी ४१.८, राणीसावरगाव ३०.३, पिंपळदरी १५.८, चाटोरी १३.८, बनवस १८.५, रावराजूर १२.५, ताडकळस २०.५, लिमला २२.३, कात्नेश्वर २२.३, कावलगाव १४.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २०.८, डिग्रस कऱ्हाळे १२, औंढा नागनाथ २५.५, गोरेगाव २५, आजेगाव २५, पानकन्हेरगाव १०.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT