Crop Damage
Crop Damage Agrowon

Crop Damage : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला

Heavy Rain Crop Loss : कुंभार पिंपळगावसह परिसरात रविवारी (ता. २२) दुपारी दोन वाजेपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
Published on

Jalana News : कुंभार पिंपळगावसह परिसरात रविवारी (ता. २२) दुपारी दोन वाजेपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

गेली पंधरा दिवसांपूर्वी परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यामुले कपाशी, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातन उरलेले पीक थोडे सुधारत असतानाच रविवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची काढणी सुरू आहे.

काही शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन काढून ढीग टाकलेले आहेत, तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे. पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून, हातातोंडाला आलेला घास पाण्यात गेला आहे. अनेक ठिकाणी काढलेल्या सोयाबीनमध्ये गुडघ्याइतके पाणी साचले असून, ढीगही पाण्यात गेले आहेत. तसेच, काही ठिकाणी फुटलेला कापूसही भिजून गेला आहे.

Crop Damage
Soybean Crop Damage : ...अखेर पालकमंत्री विखे पाटील पोचले बांधावर

अंकुशनगर परिसरात सोयाबीनचे नुकसान

पंधरा दिवसानंतर अंकुशनगर परिसरात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, दुसरीकडे कापूस, ऊस पिकाला फायदा झाला आहे.

या पावसामुळे सोयाबीन पिकांची काढणी लांबणीवर गेली आहे.अंकुशनगर, महाकाळा, गहीनीनाथनगर, राजेशनगर, कृष्णनगर, भगवाननगर इत्यादी ठिकाणी पावसाच्या सरी चांगल्याच बरसल्या आहेत. या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

Crop Damage
Crop Damage Survey : अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

गोंदी परिसरात नदी-नाल्यांना पूर

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीस दमदार बरसलेल्या पावसाने गोंदी परिसरात यंदाच्या पावसाळ्यातील सर्व अनुशेष भरून काढला होता. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसाच्या उघडीपीनंतर रविवारी (ता. २२) गोंदी परिसरातील दहा ते पंधरा गावात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने पुन्हा एकदा परिसरातील नदी-नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत.

परिसरातील गोदापात्राबरोबरच प्रकल्पात यापूर्वीच पाणीसाठा मुबलक प्रमाणात झाला आहे. साहजिकच उसासारख्या पिकाला हा पाऊस फायदेशीर आहे. मात्र, आता आणखी पाऊस पडत असल्याने शेतातील काढणीला आलेले बाजरी, सोयाबीन व तोडणीला आलेल्या मोसंबी, डाळिंब या फळपिकाबरोबरच वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत, तर गोदाकाठावरील गावचे ग्रामस्थ पुराच्या भीतीने धास्तावले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com