Heavy Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rainfall : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडल्याने मोठी हानी

Khandesh Rain Update : खानदेशात शनिवारपासून (ता. १३) सोमवारपर्यंत (ता. १५) अनेक भागांत अतिवृष्टी झाली. रस्ते वाहून गेले असून, यात मोठा खर्चही पाण्यात गेला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात शनिवारपासून (ता. १३) सोमवारपर्यंत (ता. १५) अनेक भागांत अतिवृष्टी झाली. रस्ते वाहून गेले असून, यात मोठा खर्चही पाण्यात गेला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, पारोळा, चाळीसगाव, नंदुरबारातील शहादा, नवापूर आदी भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीने अनेक गावांत जमीन खरडून माती वाहून गेली. पिके पाण्याखाली आहेत. जळगाव तालुक्यात कानळदा, फुपनगरी, भोकर, कठोरा, भादली खुर्द, गाढोदे, पळसोद आदी भागात तापी, गिरणाकाठी जमिनी खरडून मोठी हानी झाली आहे.

चोपड्यातील गोरगावले, वडगाव, खेडीभोकरी, अडावद, धानोरा, मितावली, पुनगाव, कमळगाव, वटार आदी भागांतही तापी नदीच्या क्षेत्रातील शेतांचे बांध फुटले. माती वाहून गेली. माती पिकांवर आली असून, केळी, कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. एरंडोलातील उत्राण, पारोळ्यातील शेळावे, बहादरपूर, चाळीसगावातील हातले व अन्य भागात जमिनी खरडणे, शेतात पाणी साचणे अशा समस्या तयार झाल्या आहेत. यामुळे मोठी वित्तीय हानी झाली आहे.

शहादा तालुक्यातील सारंगखेडा व परिसरात अतिवृष्टी झाली आहे. तसेच नवापुरातही जमीन खरडल्याने पिके व माती वाहून गेली आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे सुरू आहेत. अतिवृष्टीसंबंधी सरसकट माहिती संकलन करून अहवाल तयार केला जाणार आहे. यात पिकहानी, घरगोठ्यांचे नुकसान, शासकीय मालमत्तांची हानी याबाबत माहिती समाविष्ट केली जाईल. तसे आदेश जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्याची माहिती मिळाली. पाऊस सुरूच आहे. सोमवारीही काही भागात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे पंचनामे पुढेही सुरूच राहतील. नुकसानीची माहिती दोन-तीन दिवसात संकलित करून जिल्हा प्रशासनाला तालुकास्तरावरून अहवाल सादर केले जातील, अशी माहिती मिळाली.

कापूस अन्य पिकात रोगराईची भीती

खानदेशात अतिपावसाने शेतातील सखल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याची स्थिती आहे. कारण अधूनमधून पाऊस येतच आहे. काळ्या कसदार जमिनीत अनेक भागात पिकांत तलावासारखी स्थिती आहे. यामुळे कापूस, उडीद, मूग, तूर, मका आदी पिकांची मोठी हानी होत आहे. पिके पिवळी लाल पडली आहेत. त्यात खते देऊन, फवारणी घेऊनही उपयोग नाही. कारण सततच्या पावसाने पाणी तसेच राहत आहे. काळ्या कसदार जमिनीत वाफसा स्थिती तयार होण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purandar Airport: हरकती घेतल्यानंतरही विमानतळासाठी जमिनी का घेता?

Chakan Market: चाकण बाजारामध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ

Pune Rain: घाटमाथ्यावर संततधार सुरूच; धरणांतून विसर्ग

Manikrao Kokate: कृषिमंत्री कोकाटेंबाबत आज निर्णय होणे शक्य

Lumpy Skin Disease: सोलापुरात ‘लम्पी’चा संसर्ग वाढला; संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित

SCROLL FOR NEXT