Palghar News: सूर्या प्रकल्पातील धामणी धरणामधील मोठ्या जलसाठ्याचा विविध उपयोग केला जातो. शेती, पाणीपुरवठा, वीजनिर्मितीचा वापर केला जातो. आता पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनालाही मोठी गती मिळाली आहे. या धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता सरकारने मत्स्यपालनासाठी परवानगी दिली असून, पाच वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट दिले जातात..धामणी व कवडास धरण मिळून सुमारे १६०० हेक्टर जलक्षेत्र असून, सरकारच्या जाहिरात आयुक्त कार्यालयामार्फत यासाठी दरवर्षी ठेके काढले जातात. विविध सहकारी सोसायट्या, तसेच खासगी व्यावसायिक ठेका भरू शकतात. ठेक्याची रक्कम अडीच लाखांपासून अकरा लाखांपर्यंत असते. ठेक्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मत्स्यव्यवसाय विभाग व जलसंधारण विभाग यांना प्रत्येकी ५० टक्के महसूल मिळतो..Cage Fish Farming : शेततळ्यात पिंजरा पद्धतीने शाश्वत मत्स्यशेती करणे शक्य.धरण परिसरात रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी मत्स्यपालन महत्त्वाचे साधन ठरत आहे. २०१६ पासून जलाशयांमध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन योजना सुरू झाली असून, माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. योग्य जाळे, तरंगता पिंजरा, उच्च प्रतीचे मत्स्यबीज यांचा वापर या पद्धतीत आवश्यक मानला जातो..Cage Fish Farming: पुण्यात पिंजरा मत्स्यसंवर्धन कार्यशाळा; मत्स्यव्यवसायात नवे तंत्र!.धामणी धरणात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन अंतिम टप्प्यात आले आहे. धरणातील मत्स्यपालनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असून, यापुढील काळात या क्षेत्राला आणखी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे..पिंजरा पद्धत : तरंगत्या पिंजऱ्यांमध्ये जाळे बसवून मासे पाळले जातात. प्लॅस्टिकचे ड्रम व पाइपच्या सांगाड्याने पिंजरा तयार केला जातो.नियंत्रण पद्धत : धरणातील पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म व पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन मासे वाढवले जातात..धामणी धरणातील चालू चक्र पूर्ण होत असून, पुढील महिन्यात नवीन ठेका जाहीर केला जाणार आहे.- दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, पालघर-ठाणे मत्स्य व्यवसाय विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.