महायुतीमध्ये अंतर्गत वाद वाढू नये म्हणून महायुतीच्या समन्वय समितीने मोठा निर्णयमहायुतीच्या घटक पक्षातील कोणालाही एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाहीयावर एकमत झाल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती.Maharashtra politics: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीदरम्यान फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले. अजूनही नेत्यांचे पक्ष प्रवेश सुरुच आहेत. यामुळे 'महायुती'मध्ये धुसफूस वाढल्याची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये (Mahayuti) अंतर्गत वाद वाढू नये म्हणून महायुतीच्या समन्वय समितीने मोठा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या घटक पक्षातील कोणालाही एकमेकांच्या पक्षात प्रवेश द्यायचा नाही. यावर एकमत झाल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शनिवारी (दि. ६ डिसेंबर) स्पष्ट केले. .''कुटुंबात काम करत असताना मतभेद हे असतातच. पण आमच्यामध्ये मनभेद नाहीत. एकमेकांशी बोलू शकत नाही, अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की एकमेकांच्या तोंडाकडे जरी पाहिले तरी मारपीट करतात. आम्ही तसे नाही. आम्ही मतभेद झाले तरी पाच मिनिटांत बोलून मतभेद दूर करतो. आमच्यामध्ये मनभेदाला थारा नाही. पूर्वी महायुतीमध्ये ठरले होते की महायुतीच्या कुठल्याही पक्षाचा व्यक्ती कुठही पक्षप्रवेश करायचा नाही, यावर आता एकमत झाले आहे. दोन- तीन दिवसांत यावर बैठक होईल. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा भाजपमध्ये नाही आणि भाजपचा शिवसेनेत नाही, असा निर्णय आम्ही केलेला आहे.'' असे बावनकुळे यांनी म्हटले आहे..Maharashtra Politics: निवडणूक आयोग इतके दिवस झोपला होता का? .यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की, वरिष्ठ मंडळी बसतील. या सर्व गोष्टींची चर्चा होईल. या सर्व गोष्टींवर आता पडदा पडला पाहिजे. महाराष्ट्रातील सगळ्या भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांना आपआपसातल्या असणाऱ्या कुणालाही घेऊ नये, हा निर्णय घेतला आहे..Farm Loan Waiver: जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली.दरम्यान, फोडाफोडाच्या राजकारणामुळे शिंदेंची शिवसेना रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यावर चव्हाण यांनी मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे म्हटले होते. .त्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी, आमच्यामध्ये कुठेही वाद नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले. आमच्यामध्ये पडद्याआड ज्या गोष्टी चालत असतात त्या सगळ्या उघड करणे मला योग्य वाटत नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.