Parbhani News: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. इच्छूक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी vmddp.com या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. .राज्य शासनाने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. यात परभणी व हिंगोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ५० टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या दुधाळ गाई/म्हशी वाटप, बाह्य फलन तंत्राद्वारे (आयव्हीएफ) गाभण कालवडींचे ७५ टक्के अनुदानावर वाटप केले जाणार आहे..Dairy Development Project: विदर्भ-मराठवाड्यात ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू: नितीन गडकरी.याशिवाय ५० टक्के अनुदानावर विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्र, पशुखाद्यासाठी २५ टक्के अनुदान, फॅट व एस.एन.एफ. वर्धकासाठी २५ टक्के अनुदान, मुरघास २५ टक्के अनुदान तसेच १०० टक्के अनुदानावर उच्च प्रतीचे वैरण बियाणे वाटप करण्यात येणार आहे. दुग्ध उत्पादक पशुपालकांना प्रगतिशील दुग्ध उत्पादकांच्या गोठ्यावर नियमित प्रात्यक्षिकांसह आधुनिक पद्धतीने दुग्धउत्पादन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हाभरात पशुवैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. .Dairy Development: विकसित महाराष्ट्र २०४७साठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती स्थापन; मंत्री अतुल सावे यांची माहिती.पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन दुधाळ जनावरे असावीत. त्यांची एन.डी.एल.एम. प्रणालीवर नोंद आवश्यक आहे. किमान तीन महिने जिल्हा दूध संघ सहकारी दूध संकलन केंद्रावर किंवा खासगी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक असून तसे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, सात-बारा, रेशनकार्ड, दुग्ध उत्पादन प्रमाणपत्र, भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत दुधाळ जनावरांचे टॅग क्रमांक, बँकेचे खाते पुस्तक ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. .माहितीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी. जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) कार्यालय, प्रशासकीय इमारत, परभणी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. केशव सांगळे यांनी केले. प्रकल्पाची अंमलबजावणी करून लाभ तळागाळातील पशुपालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, सीईओ नतीशा माथूर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व सीईओ विवेक गायकवाड यांनी दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.