Chandrapur News: राजुरा नगरपालिका निवडणुकीत भाजप पदाधिकाऱ्यांकडून मतांसाठी पैसे वाटप करण्यात येत असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. याप्रकरणी तहसीलदारांकडून चौकशीचे पत्र पोलिसांना देण्यात आले. मात्र त्यानंतरही कोणतीच कारवाई केली गेली नसल्याचा आरोप होत आहे. .राजुरा विधानसभा मतदारसंघ आधीच ‘मतचोरी’ आणि बोगस मतदानाच्या आरोपांमुळे देशपातळीवर चर्चेत आला होता. आता राजुरा नगरपालिका निवडणुकीत थेट एक मत मिळविण्यासाठी ५ हजार रुपये देण्याचा खुलेआम खेळ सुरू असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत..Marakadwadi Ballot Paper Voting : मारकडवाडीत पोलिसांचा हेकेखोरपणा; २०० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल.भाजपचे जिल्हा महासचिव हरिदास झाडे आणि भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पांडुरंग चिल्लावार हे ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल उघडपणे वाटप करत असतानाचे कथित व्हिडिओ समोर आले आहेत. काँग्रेस कार्यकर्ते सूरज ठाकरे यांनी याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी ओमप्रकाश गौड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली..Postal Votes : पोस्टल मतांनी पटोलेंना तारले .तक्रारीनंतर तहसीलदारांनी प्रकरण पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवले आणि राजुरा ठाणेदारांना चौकशीचे पत्र लिहिले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाईझालेली नाही. आचारसंहिता पथक घटनास्थळी गेले असता तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे सांगून अधिकाऱ्यांनीहात झटकले..कारवाईचा देखावायापूर्वीच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार देवराव भोंगळे यांच्या एका समर्थकाच्या पेट्रोल पंपावर निवडणूक दक्षता पथकाने ६१ लाख रुपये जप्त केले होते. त्या रकमेचा हिशेब आजतागायत लागलेला नाही. आता नगरपालिका निवडणुकीतही असाच पैशांचा खेळ खुलेआम सुरू असून, व्हिडिओ पुरावे असतानाही कारवाईचा फक्त देखावा सुरू असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.