Maharashtra Heavy Rain : अठ्ठावीस मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांत तब्बल २८ मंडलांत मंगळवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अतिवृष्टी झाली.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांत तब्बल २८ मंडलांत मंगळवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अतिवृष्टी झाली. अपवाद वगळता अनेक भागात हा पाऊस दिलासा देणारा ठरला.

अतिवृष्टी झालेल्या या मंडलांमध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, धाराशिवमधील प्रत्येकी तीन, बीडमधील पाच व हिंगोलीतील सर्वाधिक सात मंडलांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सर्वाधिक सरासरी ६९ मिलिमीटर, पाटोदा तालुक्यात ४७.३ शिरूर कासार ३९.१, तर अंबाजोगाईत सरासरी २५.९ व बीड तालुक्यात १९.७ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain Update
Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

जालना तालुक्यात सरासरी ४३.९० मिलिमीटर, बदनापूर ११.९०, भोकरदन ११.४०, परतूर ३४.७०, मंठा ४६.३०, अंबड २६.२०, घनसावंगी १३.७० तर जाफराबाद तालुक्यात सरासरी ४.८० मिलिमीटर पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४४.३ मिलिमीटर, गंगापूर ३७.८, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३५.९, खुलताबाद २४, सोयगाव १०.१, सिल्लोड ८.३, वैजापूर ७.९, कन्नड ३.२ तर फुलंब्री तालुक्यात सरासरी २.७ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस ( २० मिमीच्या पुढे)

जालना जिल्हा : जालना शहर २२.५, जालना ग्रामीण ३८.३, नेर ५४.८, शेवली ६०, विरेगाव ५०.३, रामनगर ५८.३ ,पाचनवडगाव ५८.३, अंबड २६, जामखेड ५८ ,परतूर ५९ , श्रीष्टी २६.८, तीर्थपुरी ४२.५, रांजणी ३८.३, मंठा ३२.३, तळणी २१.८, पांगरी ५४.८.

बीड : पाली २९, म्हालसाजवळा २१.५, नाळवंडी ५३, मांजरसुंबा ४२.३, चौसाळा २४, थेरला ५५, दौलावडगाव ४२.३, पिंपळा ५५.३, पाचेगाव ३७, चकलांबा ३५.३, अंबाजोगाई ४०.३, घाटनांदुर ५७.३, विडा २१.३ ,नांदुरघाट ३५ ,शिरूर कासार ५२.३ ,रायमोहा ३५.८, तिंतरवणी २९.३.

Rain Update
Monsoon Rain 2024 : मराठवाड्याला पावसाने झोडपले

छत्रपती संभाजीनगर जिल्हा : छत्रपती संभाजीनगर ५१, उस्मानपुरा ३२, भावसिंगपुरा ४७.५, कांचनवाडी २८, करमाड २८.५, हरसुल ३३.५, पंढरपूर २८, पिसादेवी ३०.३, शेकटा ६३.५, वरुडकाजी ४०.८, आडुळ ५०.५, पिंपळवाडी ५४.३, बालानगर ३०.८ ,नांदेड ५७ ,लोहगाव ४५.५, ढोरकीन ६२.३, पैठण ३५.८, पाचोड ४८.५, आपेगाव ५२.५, गंगापूर २२.५, मांजरी २२.८, शेंदूरवादा ५२.३, तुर्काबाद ५७.५, वाळूज ३९.३, डोणगाव ४५, सिद्धनाथ वडगाव २०.८, असेगाव ४०.८, गाजगाव २०.८, जामगाव ३५.३, वेरूळ ३०.३, बाजार सावंगी ३०.३.

अतिवृष्टी झालेली मंडले (मिमी)

चित्तेपिंपळगाव १०८.५०

विहामांडवा ६५.५०

भेंडाळा ७९.७५

रोहिलागड ७३.७५

वाटूर ७३.५०

ढोकसाळ ७६.२५

अमळनेर १०६.५०

आष्टी ७३

कडा ६८.७५

धामणगाव ८५.५०

धानोरा १०३.५०

पानचिंचोली ९०

औराद १२१

हलगरा १२१

मोहा ७१.७५

गोविंदपूर ६५.७५

तेरखेडा ६९

बाऱ्हाळी ६५.५०

सांगवी १२०.७५

चारठाणा ८९.२५

वाघी धानोरा ६५.७५

सिरसम ७४

माळहिवरा ६५.७५

सेनगाव ७४

गोरेगाव ७४

आजेगाव ७४

पानकण्हेरगाव ६५

हट्टा १०६.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com