Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ११ मंडलांत अतिवृष्टी

Rainfall Update: अनेक दिवसांच्या खंडानंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ८० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ११ मंडलांत अतिवृष्टी झाली. प

Team Agrowon

Parbhani News: अनेक दिवसांच्या खंडानंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ८० मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये या दोन जिल्ह्यांतील ११ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील १, तर हिंगोली जिल्ह्यातील २ मंडलांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.

ताणांवर गेलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळाला. परंतु अतिवृष्टीमुळे नाले, ओढ्यांच्या पुराचे पाणी शिरल्यामुळे खरीप पिके पाण्यात बुडल्याने नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील अनेक मंडलांत पावसाने हुलकावणी दिली.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर, पूर्णा तालुक्यांत पावसाचा जोर होता. या तालुक्यांतील ५ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. अनेक मंडलांत पावसाने हुलकावणी दिली. जिल्ह्यात  मागील २४ तासांमध्ये सरासरी २३.५ मिमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात सरासरी २९.७ मिमी तर यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ३३७ मिमी (७९.६ टक्के) पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यांत पावसाचा जोर होता. जिल्ह्यातील ६ मंडलांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ४८.८ मिलिमीटर ऑगस्ट महिन्यात एकूण सरासरी ५३.२ मिमी, तर यंदा १ जूनपासून आजवर सरासरी ४२२.३ मिमी (९१.५ टक्के) पाऊस झाला.

अतिवृष्टी झालेली मंडळे ...

परभणी जिल्हा बामणी ७१.८, बोरी ६७.३, आडगाव १०१, ताडकळस ७८.८, लिमला ७८.८, हिंगोली जिल्हा ः नरसी नामदेव १०७, कळमनुरी ७०, वाकोडी ११५.८. नांदापूर ८७, वारंगा ८३, सेनगाव ७४.८.

मंडलनिहाय पाऊस (१० मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः परभणी ११.८, परभणी ग्रामीण १६.५, पेडगाव २०, जांब १०.५, झरी २८.८, सिंगणापूर १५, दैठणा २६.५, पिंगळी १६.५, टाकळी कुंभकर्ण २०.३, जिंतूर ५६, सावंगी म्हाळसा ४६.८, चारठाणा १३.३, वाघीधानोरा १८.३, दूधगाव २३.८, सेलू १३.८,वालूर २१.५,कुपटा ३३.८, मानवत १६.५, कोल्हा १०, ताडबोरगाव १०, रामपुरी १८.५, पाथरी १६.५, सोनपेठ ११.३, आवलगाव १२, शेळगाव १२, वडगाव २२.३, गंगांखेड १८.३, महातपुरी २२.३, माखणी १३, पिंपळदरी१३.८, पालम १२.५, पेठशिवणी २६, रावराजूर ५५.३, पूर्णा ३८, कात्नेश्‍वर ११.८, चुडावा २४, कावलगाव २१.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ५०, सिरसम ४३.८, बासंबा ५०, डिग्रस कऱ्हाळे ४०.३, माळहिवरा ४३.८, खंबाळा ४३.८, आखाडा बाळापूर २१.५, डोंगरकडा ४८.३, वसमत २४.३, अंबा ४०, हयातनगर २४.३, गिरगाव ३४.५, हट्टा १४.५, टेंभुर्णी २४.३, कुरुंदा ४०, औंढा नागनाथ ४४.८, येळेगाव ४५, साळणा ४९.८, जवळा बाजार ४४.८, गोरेगाव २८.८, आजेगाव २८.८, साखरा ४९.३, पानकन्हेगाव ४५, हत्ता ४६.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT