आज आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, वांगी आणि कारली बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीन आज स्थिरदेशातील बाजारात सोयाबीनचे भाव आज स्थिरावले होते. बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. सोयाबीनला उठाव मात्र चांगला मिळत आहे. सोयातेलाला सध्या चांगला आधार मिळत आहे. त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हमीभावाच्या जवळ पोचला आहे. सध्या देशातील बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ४०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान पोचलेले आहेत. बाजारात सोयाबीन आवक पुढील काही दिवस कमीच राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस भाव कमीचदेशातील बाजारात कापूस भाव दबावातच आहेत. कापसाला पुढे उठाव कमी असल्याचे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगितले जात आहे. युध्दामुळे कापड निर्यातीवर परिणाम होत आहे. निर्यातीसाठी खर्च वाढला आहे. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेच्या बाजारातील निर्यातीवर परिणाम होत आहे. याचा दबाव कापूस भावावर येत आहे. सध्या बाजारात कापूस प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. सीसीआयची कापूस विक्रीही सुरुच आहे. त्यामुळे कापूस बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: डाळिंबाचा भाव तेजीत; सोयाबीनमध्ये काहीशी वाढ, कापूस दर स्थिर टोमॅटो भावात चढ उतार तर ज्वारीला उठाव .हरभरा दबावातदेशातील बाजारात हरभरा आवक वाढत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये आवक वाढलेली आहे. तसेच आयात मालही उपलब्ध आहे. यामुळे देशात हरभऱ्याचा पुरवठा वाढून बाजारावर दबाव येत आहे. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात बाजारातील हरभऱ्याची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हरभरा दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: कांदा, कापूस-मक्याचे दर दबावात; सोयाबीन स्थिर तर खरबुजाची आवक वाढली.वांग्याला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून वांग्याची आवक सुधारली आहे. याचा परिणाम दरावरही दिसून येत आहे. वांग्याला सध्या लग्न सराई आणि समारंभामुळे मागणीही चांगली आहे. पण आवकेचा दबाव काहीसा वाढल्याने दरात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. सध्या बाजारात वांगी सरासरी २ हजार ते २५०० रुपयाने विकली जात आहे. पुढील काही दिवस बाजारातील वांगी आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही काहीसे दबावात राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .कारले टिकूनराज्यातील बाजारात कारल्याची मागणी टिकून आहे. तर दुसरीकडे कारल्याची आवकही स्थिर दिसत आहे. त्यामुळे भावपातळीही बहुतांशी बाजारात स्थिरावली आहे. सध्या कारली बाजारात ४ हजार ५ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकली जात आहे. बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर दुसरीकडे कारल्याला उठावही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्यचे भाव या भावपातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज कारली बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.