
Parbhani News : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेत सोमवार (ता. ४) सकाळ पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ९९ हजार २६८ शेतकऱ्यांनी ७ लाख ८१ हजार २२५ विमा अर्ज दाखल केले आहेत.
या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्व हिश्श्याचा ५५ कोटी ५ लाख रुपये विमा हप्ता भरला असून ५ लाख ८ हजार ६३० हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार ८९२ कोटी ९४ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे.
या दोन जिल्ह्यातील यंदाच्या एकूण पेरणीक्षेत्रापैकी ३ लाख ४२ हजार हेक्टरवरील पिके अद्याप विमा संरक्षणाविना आहेत. परभणी जिल्ह्यातील २ लाख ७२ हजार ४५१ शेतकऱ्यांनी ५ लाख २९ हजार ७६९ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यात ४ लाख ९९ हजार १८३ हेक्टरवर (९६.२८ टक्के) पेरणी झाली असून त्यापैकी ३ लाख ५४ हजार ७७० हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार २० कोटी ७५ लाख रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.
शेतकऱ्यांनी स्वहिश्याचा ३९ कोटी ४ लाख ५७ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. शेतकरी, राज्य, केंद्र यांचा मिळून एकूण २८२ कोटी ४५ लाख रुपये विमा हप्ता आहे. हिंगोली जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी २ लाख ५१ हजार ४५६ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यात ३ लाख ५२ हजार २६ हेक्टरवर (८७.७८ टक्के) पेरणी असून आजवर १ लाख ५३ हजार ८६० हेक्टरवरील पिकांसाठी ८७२ कोटी १९ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे.
शेतकऱ्यांनी १६ कोटी १ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. शेतकरी, राज्य, केंद्र मिळून एकूण १२९ कोटी ९१ लाख रुपये विमा हप्ता आहे. यंदा परभणी व हिंगोली जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत पीकविमा योजना राबविली जात आहे.
परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ पिकांना तर हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या ६ पिकांचा विमा योजनेत समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.