Heavy Rainfall Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rainfall: महाराष्ट्रात दोन दिवसांत मुसळधार पावसाने मोठे नुकसान

Maharashtra Rain:: गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अहवालानुसार, कोकणात १५० ते २०० मिमी आणि विदर्भात सर्वाधिक २४२ मिमी पावसाची नोंद झाली.पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला, तरी बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Sainath Jadhav

Pune News:गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अहवालानुसार, कोकणात १५० ते २०० मिमी आणि विदर्भात सर्वाधिक २४२ मिमी पावसाची नोंद झाली.पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला, तरी बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी पूराचा धोका आणि काही ठिकाणी भूस्खलनाची भीती वाढली आहे. हवामान खात्याने २७-२८ जूनसाठी मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.दोन दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. कालपासून मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे.

ज्यामुळे खरीपातील पिकांना दिलासा मिळाला.खरीपाची पेरणी झाल्यापासून मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली होती.  कोकणात १५० मिमी, तर विदर्भात सर्वाधिक २४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, तर मुंबईतही पावसाचा जोर वाढला.

मुंबईत सांताक्रूझ येथे १२० मिमी पावसाची नोंद झाली.पश्चिम महाराष्ट्रात कोयना आणि अलमट्टी धरणांतून अनुक्रमे २ टीएमसी आणि १.२५ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला, ज्यामुळे सांगली आणि कोल्हापूरातील काही गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे. साताऱ्यातील घाटमाथ्यावर १८० मिमी पाऊस पडल्याने भूस्खलनाचा धोका वाढला. मे महिन्याच्या तुलनेत जूनमधील पावसाने राज्यात २१ जणांचा बळी घेतला आहे.

पिकांचे नुकसान 

बागायती क्षेत्रातील आंबे, डाळिंब, संत्री, फळबागा व भाजीपाला अशा विविध पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अंदाजानुसार २९,४८३ हेक्टरक्षेत्रावर नुकसान झाले आहे .नांदेड येथे जवळपास ३८ मंडलात पिके पाण्याखाली गेली. या पावसामुळे मराठवाड्यात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद या पिकांना फटका बसलाय. 

हवामान खात्याने २७-२८ जूनसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांना सखल भागात जाणे टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यात मुंबई ,ठाणे, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबारसह संपूर्ण विदर्भाचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crop Fire: शॉर्टसर्किटमुळे १५ एकर ऊस जळून खाक

Raigad Irrigation Projects: सिंचन प्रकल्प कागदावरच

Water Extraction Ban: कृष्णा, उरमोडी नदीवरील पाणी उपशावर बंदीचे आदेश

Farm Loan Waiver: कर्जखात्यांची तपासणी पूर्ण, आता कर्जमाफीची प्रतीक्षा

Illegal HTBT Cotton Seeds: संशयास्पद कापूस बियाण्यांची ६० पाकिटे जप्त, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT