Jalgaon Monsoon Update: उत्तर महाराष्ट्रात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यातील पारोळा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यांना जोरदार फटका बसला. अनेक गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आल्याने संपर्क तुटला, तर हजारो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, मका, केळी, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, पशुधन वाहून गेले, पोल्ट्री व्यवसायाचे नुकसान झाले आणि शेतीपयोगी साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीच्या पंचनाम्यांसह आर्थिक मदतीची मागणी केली आहे..पारोळा तालुक्यातील देवगाव, जोगलखेडा, करंजी बुद्रुक, चोरवड, रत्नापिंप्री, दबापिंप्री, नेरपाट, भोकरबारी आदी भागांत पावसाने हाहाकार माजविला. शेतातील उभी पिके, सोलर पंप, ठिबक संच, कृषिपंप, शेती अवजारे, गोठे आणि घरे यांचे मोठे नुकसान झाले. देवगाव परिसरात दुधाई नाल्याला आलेल्या महापुरामुळे अनेक घरे कोसळली, तर काही जनावरे दगावली व वाहून गेली. पुराच्या पाण्यामुळे सुपीक माती वाहून गेल्याने अनेक शेतजमिनी लागवडीस अयोग्य झाल्या आहेत..भडगाव तालुक्यातही मुसळधार पावसाने पिके अक्षरशः वाहून गेली. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचले असून कपाशी, सोयाबीन, केळी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात पशुधनही पुरात वाहून गेले. नालबंदी येथे शाळेत पाणी शिरल्याने शिक्षकांना छतावर आश्रय घ्यावा लागला. आमदार किशोर पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत..Water Crisis Management: संभाव्य जलसंकटावर मात करण्यासाठी उपाययोजना.चाळीसगाव तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत सुमारे ४९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भराडी, वाघी आणि नारळी नदीसह अनेक नाल्यांना पूर आल्याने वाहतूक काही काळ विस्कळित झाली. बहाळ येथील भिल्ल वस्तीत पाणी शिरले, तर वरखेडे गावाचा टेकडी वस्तीशी संपर्क तुटला. प्रशासनाने पूर्वसूचना देऊन स्थलांतर केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.विसापूर येथे पोल्ट्रीफार्ममध्ये पाणी घुसल्याने सुमारे साडेपाच हजार कोंबड्या दगावल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. खेडगाव परिसरात शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले..Water Management: भारतातील पाणी व्यवस्थापन : इतिहासातील चुका.दरम्यान, गिरणा धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्हाधिकारी रोहन घुगे, विविध तालुक्यांतील तहसीलदार, महसूल अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कृषी व महसूल विभागाकडून नुकसानग्रस्तांनी जिओ-टॅगिंगसह आवश्यक माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नागपूर येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) तीन अधिकारी व ३१ जवानांचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे..मुसळधार पावसाचा प्रमुख फटकापारोळा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यांत शेतीचे मोठे नुकसानकपाशी, सोयाबीन, मका, केळी, तूर आदी पिके पाण्याखालीअनेक घरे, गोठे, सोलर पंप, कृषिपंप व शेती अवजारांचे नुकसानकाही ठिकाणी जनावरे वाहून गेली; विसापूर येथे ५,५०० कोंबड्या दगावल्यानदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलापंचनामे करून तातडीची आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.