Weather Forecast Accuracy, : ‘क्वांटम कम्प्युटिंग’द्वारे अचूक हवामान अंदाज शक्य

Quantum computing : पावसाचे अनुमान योग्य पद्धतीने आपल्याला वेळेवर कळत नाहीत. किती पाऊस पडेल याचा अंदाज अचूकरित्या बांधता येत नाही. सध्या अस्तित्वात संगणकांची प्रक्रियाक्षमता कमी आहे.
Weather Forecast
Weather Forecast Agrowon
Published on
Updated on

Nashik News : पावसाचे अनुमान योग्य पद्धतीने आपल्याला वेळेवर कळत नाहीत. किती पाऊस पडेल याचा अंदाज अचूकरित्या बांधता येत नाही. सध्या अस्तित्वात संगणकांची प्रक्रियाक्षमता कमी आहे. मात्र त्यातून कितीतरी पटीने अधिक ही क्षमता क्वांटम कम्प्युटिंगमध्ये आहे. यातून रियल टाइम वेदर फोरकास्टिंग देऊ शकते, क्वांटम कम्प्युटिंग हे उद्याचे भविष्य आहे, असे प्रतिपादन संगणकतज्ज्ञ डॉ. उदय वाड यांनी दिली.

केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाचे सृजनशील विकेंद्रीकरणाचे ध्येय साधण्यासाठी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने चार नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये हीटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, लीन मॅन्युफॅक्चरिंग अँड मॅनेजमेंट, ‘क्वांटम कम्प्युटिंग’ यांचा समावेश आहे.

Weather Forecast
Monsoon Update: वारणा धरण क्षेत्रात संततधार पाऊस

३ सत्रात १८ क्रेडिटचे अभ्यासक्रम असणार आहे. हे शिक्षणक्रम पूर्ण करताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्यक्ष कंपनीत काम करण्याचाही अनुभव मिळेल. त्यामुळे पदवी पूर्ण होताच अभियंते चार वर्षांचा अनुभव घेऊनच बाहेर पडणार असल्याने त्यांना कंपन्यांमध्ये लागलीच मोठ्या पगाराची नोकरी मिळण्यासह स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करता येईल, असा विश्वास महाविद्यालयाचे संचालक प्रा. डॉ. केशव नांदूरकर यांनी व्यक्त केला.

संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांच्या नेतृत्वाखाली संस्था नव्या शैक्षणिक ध्येयांच्या दिशेने पुढे जात आहे. औद्योगिक क्षेत्रात अनुभव असलेल्या तज्ज्ञ अभियंत्यांनी आखलेले हे अभ्यासक्रम हे तज्ज्ञ स्वतः शिकवणार आहेत. नवीन शिक्षण धोरणात अभिप्रेत असलेल्या ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ या पदावर अशा तज्ज्ञ लोकांची नेमणूक करणाऱ्या देशातील मोजक्या महाविद्यालयांपैकी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय हे एक आहे.

Weather Forecast
Pune Rain: ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक ३४० मिलिमीटर पावसाची नोंद

अभ्यासक्रमांच्या घोषणेप्रसंगी उपस्थित डॉ. उदय वाड, जयंत कुलकर्णी, सुरेश दिडमिशे आणि अनिल आहेर  या चार तज्ज्ञ अभियंत्यांनी अभ्यासक्रमांचे औद्योगिक क्षेत्रासाठी असलेले महत्त्व सविस्तरपणे विशद केले. नाशिकमधील प्रसिद्ध उद्योजक आणि या कोर्सेसच्या आखणीत मोठा सहभाग असलेले नीलेश साळगावकर यांनी औद्योगिक क्षेत्रात लागणारे ज्ञान, कौशल्ये आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यातील मोठे अंतर भरून करण्यासाठी अशा नवीन अभ्यासक्रमाची गरज असल्याचे सांगून के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कोर्सेस सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले.

या वेळी रोबोटिक्स अँड ऑटोमेशन विभागप्रमुख प्रा. डॉ. पद्माकर पवार, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रशांत कुशारे, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र मुंजे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्नेहल कमलापूर यांनी माहिती दिली. संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. के. एस. बंदी, विश्वस्तांचे मार्गदर्शन यशस्वीतेसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com