Maharashtra Fruit Crop Insurance Scheme: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२५-२६ मधील राज्य हिस्सा अनुदानासाठी १२९ कोटी, ५१ लाख, ३८ हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी तीन विमा कंपन्यांना अदा केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन विभागाने जारी केला आहे. .पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन २०२५-२६ अंतर्गत उर्वरीत राज्य हिस्सा अनुदानाकरीता कृषी आयुक्तालयाने केलेल्या शिफारशीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. .Fruit Crop Insurance: फळपीक विम्याकडे बागायतदारांची पाठ.शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, यासाठी राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन, मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होते. परिणामी, शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे. .Fruit Crop Insurance: नाशिक जिल्ह्यात ‘मृग बहर’ फळपीक विमा योजनेला सुरुवात.ही योजना सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या २ वर्षांमध्ये, आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी व द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी तसेच पपई या ९ फळपिकांसाठी भारतीय कृषी विमा, बजाज जनरल इन्शुरन्स, जनरली सेंट्रल इन्शुरन्स आणि युनिव्हर्सल सॉम्पो जनरल इन्शुरन्स आदी कंपन्यांमार्फत राबविण्यात आली. त्यासाठी ३० जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरण्यात आला..आंबिया बहार २०२५-२६ अंतर्गत उर्वरीत राज्य हिस्सा अनुदानासाठी कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना रक्कम १२९ कोटी ५१ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. .अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी ३०० कोटी निधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता ३०० कोटी निधी वितरित करण्यासही शासनाने मंजुरी दिली आहे. या महामंडळासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७५० कोटी निधीची अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यापूर्वी १५० कोटी निधी वितरित केला होता. आता ३०० कोटी निधी वितरित करण्याचा निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.