
Pune News: कोकण, पश्चिम मध्य महाराष्ट्रानंतर मराठवाडा आणि विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाडा, विदर्भात तब्बल १९५ मंडलांत अतिवृष्टी झाली. विदर्भातील वाशीममधील मुंगळा मंडलात सर्वाधिक २४२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेत तुडूंब भरून वाहू लागले असून ओढे, नाले व नद्यांना पूर आला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यात पुन्हा जोर
मध्यंतरी मराठवाड्यात कुठे आहे तर कुठे नाही, कुठे प्रदीर्घ ओढ देणारा पाऊस गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मात्र अनेक भागात सक्रिय झाल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यांतील तब्बल ८० मंडलांत अतिवृष्टी नोंदली गेली. तर दुपारपर्यंत अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच होता. दीर्घ कालखंडानंतर मराठवाडा व विदर्भात भागात मुसळधार पाऊस पडला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांत अनेक मंडलांत अतिवृष्टी झाली. सर्वाधिक नांदेड जिल्ह्यात ३८ मंडलांत अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली होती. तर नद्यांना पूर आला होता. छत्रपती संभाजीनगरमधील पाच मंडले, जालन्यातील तीन, हिंगोलीतील दहा, बुलडाण्यातील २२ मंडलांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना फटका बसला आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी
विदर्भात मॉन्सून दाखल झाल्यानंतरही पुरेसा पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीपातळी खालावली होती. मागील दोन ते तीन दिवसांपासून गडचिरोली भागात पावसाने सुरुवात केली होती. त्यानंतर बुधवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. वाशीममधील मुंगळा मंडलानंतर मालेगाव मंडलात २२१ मिलिमीटर, तर गडचिरोली पारवा मंडळात १८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील चार मंडलांत अतिवृष्टी झाली. तर वाशीमधील ३२ मंडळे, अमरावतीतील दोन, यवतमाळमधील ६०, वर्ध्यातील दोन, नागपूरमधील बारा, भंडाऱ्यातील एक, गडचिरोलीतील एक मंडलात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील २४ तासांत बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर ओसरला
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरला आहे. धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरूच आहे. कोकणातील अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी सोडण्यात आलेल्या अनेक धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट केली आहे.
त्यामुळे नद्यांतील पाण्याच्या पातळी कमी झाली असून शेती आणि पिण्याच्या प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. गेल्या मे महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. आतापर्यंत अनेक धरणांत ५० टक्केहून अधिक भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन धरणे शंभर टक्के भरली असून घोड, विसापूर, चिल्हेवाडी, वडिवळे, कासारसाई या धरणांत ७५ टक्केहून अधिक पाण्याचा साठा झाला आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे
येथे झाला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :
मंडले --- पडलेला पाऊस
मुंगळा --- २४२
मालेगाव --- २२१
हिवरा --- २०९
येथे झाली अतिवृष्टी (स्रोत - कृषी विभाग)
मराठवाडा : पिशोर ७७, नाचनवेल ९८, करंजखेड १०१, भराडी ७६ बाबारान ८१, धावडा ६६, आनवा, लिंबगाव ६५, वरूड ७६, नांदेड शहर ७४, नांदेड ग्रामीण, तुप्पा, वासरणी, वाजेगाव, कापसी, तळणी, दाभड ८४, नळेश्वर ६८, बिलोली, कुंडलवाडी, रामतिर्थ ७३, लोहगाव ७५, निवघा ७६, मंठा ९४, तामसा ६९, पिंपरखेड ७६, मातूळ ६९, किनवट ९१, बोधडी ९९, ईस्लापूर, जलंधरा ६९, शिवनी ७९, मांडवा ११९, देहली १४७,
सिंदगी, वानवळा १४१, उमरी बाजार १२५, मुगट ८५, हिमायतनगर, जवळगाव, सरसम १०१, माहूर १५६, वाई ८८, सिंदखेड १०३, नरसी ७५, वाकोडी ७८, आखडा ९४, डोंगरकडा ७०, वारंगा, गिरगाव ६७, वसमत, अंबा, हयातनगर, टेंभुर्णी ६६, कुरूंदा ७३, चिखली, घोडप १०६, एकलारा ८४, कोलारा, मेरा ७१, हातनी ७७, रायपूर ९५, साकळी, नायगाव ९२, मेहकर, डोणगाव ९३, जानेफळ, वरवरंड ७२, हिवरा ६६, शेळगाव ११७, देऊळगाव, हरडव ६५, लोणी ८२, अंजनी ९३, सुलतानपूर ७० अंजनी ६८.
विदर्भ : आलेगाव, फुलसावंगी, निगनूर १४५, चन्नी, साष्टी, निंबा, केळापूर, सिवोरा, कौथळ, इझोंरी ६६, वाशीम १२५, पार्डी टाकमोर १४३, अनसिंग ८९, नागठाणा, करंजी, जळका ११४, वारळा ११७, केकातुमारा, रिथड, राजगाव ७२, कोंढळा १२५, पार्डीआसरे ११५, रिसोड ६७, वाकड, बोरी ६८, केनवाड ११७, गोवर्धन १४०, कवथा, कुपथा ७०, शिरपूर, मेडशी ११३, किन्हीराजा ९२, चांदस ९९, आसेगाव, धानोरा १४३, , शेंदुर्जना, गिरोली १००, उंबरडा, बेलोरा ८०, येवता, पुसद ७२, हिरवखेड ७६, भातकुली, गारफळ ६६, येलबारा, जोडमोह ८६, मेटीखेडा, शिवनी ८५, चिखली, लोही, बोरी ७२, सिंगड, वरूड,
उमरी ७५, लोनबेहल १३९, सावळी, अंजनखेड १०९, नेर, खंडाळा ७१, गौळ ८२, शेंबळ ६७, ब्राम्हणगाव, जांब बाजार, मालखेड, बहादुरा, वाढोदा, दिघोरी, महालगाव, मौदा, धानळा, पारडी, हुडकेश्वर ७८, उमरखेड, कुपटी, चाटरी, बिटरगाव १०१, मुलावा ८४, विडूळ १०४, धरती १४१, , महागाव, मोरथ १३५, गुंज १०६, कळी ८१, कासोळा ८०, खडकडोह, पुरंदा, वाढोणा, मनोरा ६८, मुकूटबन ६९, शिंबाळा ९५, पांढरकवडा ६६, पाटनबोरी ८९, पाहापळ ८३, चालबर्डी ७३, रूंजा ७४, , घाटंजी, साखरा १५३, शिरोली १०२, घोटी १०२, पारवा १८६, कुर्ली १२५, धानोरा ६५, वडकी, किन्ही, पोहना ७७, वरध ११४, अल्लीपूर १२३, गोंधनी ८८, बेला ६९, कुही ६७.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.