Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain : सिन्नर, इगतपुरी तालुक्यांत पावसाचा जोर

Rain Update : नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्यामध्ये सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, त्रंबकेश्वर व देवळा या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्यामध्ये सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, त्रंबकेश्वर व देवळा या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी (ता. २३) इगतपुरीत सरासरी सर्वाधिक २९.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर सिन्नरला नायगाव महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक ७२ मिमी नोंद झाली. पावसामुळे १०० मिमी टप्पा ओलांडला असून पेरण्यांना वेग येणार आहे. अजूनही अनेक भागात पाऊस नसल्याने पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली होती. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात कापूस, मका लागवडी पूर्ण झाल्या तर शेतकऱ्यांनी मूग, बाजरी तर काही ठिकाणी सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक भागांत पाऊस पडत असल्याने पेरण्यांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात असल्याने अजूनही कळवण दिंडोरी नाशिकसह पेठ तालुक्यात पेरण्यांना वेग आलेला नाही.

गेल्या २४ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामध्ये बहुसंख्या महसूल मंडले पावसाने आबादानी झाली आहेत. मात्र अजूनही जवळपास ३८ महसूल मंडलांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने आणि भागात पेरण्या होऊन आता तो पेरा उतरला आहे.

मात्र जिल्ह्याचे मुख्य पाणलोट क्षेत्र असलेल्या पश्चिम पट्ट्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रविवारी (ता. २३) दुपारी चारनंतर जिल्ह्याचे विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. सिन्नरमधील नायगाव मंडलात अतिवृष्टी तर डुबेरे मंडलातही पावसाचा जोर दिसून आला. मालेगावच्या वडनेर, करंजगव्हाण, नाशिकच्या शिंदे, इगतपुरीच्या घोटी, वाडीवऱ्हे, टाकेद धारगाव मंडलातही पावसाचा जोर होता.

पावसाचा पिकांना आधार

सोमवारी (ता. २४) दुपारी ३ नंतर देवळा तालुक्यातील वाखरी परिसरात जोरदार तर येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना मोठा आधार झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT