Government Jobs in Seed Corporation: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) ७२३ पदांच्या आकृतिबंधाला अखेर मान्यता मिळाली असून ही पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ‘क’ संवर्गातील काही पदे आणि ‘ड’ वर्ग मृत संवर्ग घोषित करण्यात आल्याने काही पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नियमित पदांची संख्या ५६० इतकीच राहणार आहे..नव्या आकृतिबंधात १०० पदे अधिसंख्य असून ती सध्या कार्यरत आहेत. उर्वरित ६३ पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत. आकृतिबंधाला वित्त विभागाने मान्यता दिल्याने ही पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१४ मध्ये महामंडळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला होता. त्यानंतर मे २०२५ मध्ये वित्त विभागाने मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. २०१४ मधील ७९१ मंजूर पदांपैकी रिक्त असलेली ७३ पदे रद्द करण्यात आली. तर १९ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत..Agriculture Department Recruitment: बदल्यांचे ‘अर्थ’कारण.नव्याने मंजूर करण्यात आलेल्या आकृतिबंधात कामगार कल्याण अधिकारी हे पद रद्द करण्यात आले आहे. तसेच केंद्र अभियंत्यांची ९ पदे मंजूर असताना त्यापैकी १ पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा व्यवस्थापकाची ७ पदे रिक्त झाली आहेत. याशिवाय लघुलेखकाची ४, सहायक क्षेत्र अधिकारी ६९, आरेखक १, लिपिक-टंकलेखकाच्या ९० पदांपैकी ४७ आणि वाहनचालकाची १६ पदे रद्द करण्यात आली आहेत..Agri University Recruitment: कृषी विद्यापीठांच्या आकृतिबंधास मान्यता.बाह्यस्रोतांद्वारे विधी अधिकारी, उपकार्यकारी अभियंता आणि लघुलेखक यांची प्रत्येकी १, वाहनचालक १२, फोर्कलिफ्ट चालक १५, कनिष्ठ यंत्रचालक १५, शिपाई-पाहारेकरी १५ आणि सहायक माळी ३ अशी एकूण ६३ पदे भरण्यात येणार आहेत. क आणि ड वर्गातील १०० कार्यरत पदे अधिसंख्य ठेवण्यात आली आहेत. या पदांवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास, मृत्यू झाल्यास किंवा अन्य कारणांनी पदे रिक्त झाल्यास ती पुन्हा भरता येणार नाहीत..‘महाबीज’ला घरघरमहाबीज म्हणजे दर्जेदार बियाणे अशी ओळख होती. मात्र गेल्या काही वर्षांत महाबीजची उलाढाल आणि व्यवसायाचा व्याप दोन्ही आक्रसला आहे. मुळात या महामंडळाला सातत्यपूर्ण आणि सक्षम नेतृत्व मिळालेले नाही. येथे भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाते. मात्र महामंडळाच्या ५० वर्षांच्या इतिहासात तब्बल ३९ व्यवस्थापकीय संचालकांनी येथे काम केले आहे. यापैकी गेल्या १६ वर्षांत २३ अधिकारी येथे नियुक्त झाले आणि अल्पावधीतच त्यांची बदली झाली. परिणामी, महाबीजची बाजारातील विश्वासार्हता कमी होत गेली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.