Monsoon Rain : पाऊस कमी म्हणजे चिंतेत वाढ

Farmer Issue : पाऊस कमी म्हणजे पेरण्या कमी आणि पेरण्या कमी म्हणजे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, असे सूत्रच आहे.
Agriculture Weather
Agriculture WeatherAgrowon
Published on
Updated on

Impact on Agriculture due to Rainfall : जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. मृग नक्षत्र संपून आर्द्राचेही पाच दिवस उलटून गेले आहेत. अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला असे हवामान विभाग सांगत असले तरी विदर्भ, मराठवाड्यातील काही गावांमध्ये उन्हाळी मशागतीची ढेकळेच अजूनही जिरली नाहीत. यावर्षी वेळेआधी मॉन्सूनचे आगमन झाले.

१६ जूनपर्यंत राज्यात सरासरीच्या तुलनेत १० टक्के अधिक पाऊस झाला, असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानंतर मात्र मॉन्सूनची चाल मंदावली. १७ जूननंतर राज्यात केवळ ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढला. २० जूनदरम्यान राज्यात मॉन्सूनची वाटचाल थांबल्याने पावसात मोठा खंड पडल्यावर जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचा सुधारीत अंदाज हवामान विभागाला जाहीर करावा लागला.

यावर्षीच्या मॉन्सूनची आत्तापर्यंतची वर्तणूक खूपच विचित्र अशी राहिली आहे. आता जून संपत आला तरी मॉन्सूनचा सलग, सर्वव्यापी, मूर पाऊस पडतो, असा पाऊस आत्तापर्यंत कोणत्याच भागात झाला नाही. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात अजूनही वळीव स्वरूपाचाच पाऊस पडतो. एका गावात ढगफुटीसारखी जोरदार वृष्टी तर त्याला लागून असलेल्या गावात मात्र पावसाचा पत्ता नाही, असे चित्र आत्तापर्यंत अनेकदा पाहावयास मिळाले आहे.

सर्वसाधारणपणे सोलापूर जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस उशिराने पडायला सुरुवात होते. त्यामुळेच या जिल्ह्याला लेट खरीप अथवा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. यावर्षी मात्र सोलापूर जिल्ह्यावर मृग नक्षत्रापासूनच पावसाचा जलाभिषेक सुरू आहे. जून, जुलै या दोन महिन्याची सरासरी १६ जूनपर्यंतच पावसाने गाठली आहे. त्याचवेळी पावसाचे आगार मानल्या जात असलेल्या घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

Agriculture Weather
Weekly Weather : राज्यात हलक्या पावसाची शक्यता

पाऊस कमी म्हणजे पेरण्या कमी आणि पेरण्या कमी म्हणजे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, असे सूत्रच आहे. राज्यात २२ जूनपर्यंत २४ टक्क्यांपर्यंत खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण निश्चितच अधिक आहे. परंतु राज्यात १० ते २० जून दरम्यान पेरण्या आटोपल्या म्हणजे हंगामाबाबत एक चांगला संकेत समजला जातो. खरीप हंगामात पेरणीस जसजसा उशीर होईल तसतसे पीक उत्पादन घटत जाते, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

पेरणीस उशीर होत गेला म्हणजे शेतकऱ्यांचे पीक नियोजनही बिघडत जाते. पेरणीला उशीर होत असला म्हणजे कमी कालावधीची पिके (मूग, उडीद) घेणे शेतकरी टाळतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेरणी केली पण पाऊस नाही, अशा शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना तुषार सिंचनाने पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

Agriculture Weather
Agriculture Weather : हवामान वायदे : जोखीम व्यवस्थापनातील नवीन अध्याय

परंतु अशा शेतकऱ्यांची संख्या हाताचा बोटावर मोजता येईल, इतकी कमी आहे. पावसाला उशिरा सुरुवात, लवकर सुरुवात होऊन लगेच मोठा खंड, पीक वाढीच्या अवस्थेत उघडीप असे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. याचा मोठा फटका खासकरून जिरायती शेतीला बसत असून उत्पादनात मोठी घट आढळून येत आहे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीला किमान एक-दोन संरक्षित सिंचनाची सोय हाच त्यावरील उपाय आहे. मोठ्या प्रकल्पांद्वारे सिंचन क्षेत्र वृद्धीला फारच मर्यादा आहेत. अशावेळी पावसाच्या पाण्यावरील जिरायती शेती शाश्वत करायची असेल तर बहुतांश शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचन होईल एवढा पाणीसाठा असायलाच पाहिजे

शेततळ्याच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते. शिवाय पावसाळ्यात खळखळून वाहणाऱ्या नदी-नाले-ओढे यावर जागोजागी छोटे-छोटे बंधारे बांधून त्यात साठलेले पाणी परिसरातील शेतकरी संरक्षित सिंचनासाठी वापरू शकतात. त्याकरिता प्रत्येक शेतकऱ्यांकडे तुषार-ठिबक सिंचनासह पंपसेट आणि शेतीला अखंडित वीज पुरवठा मात्र झाला पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com