Heavy Rain : परभणी जिल्ह्यातील ३ मंडलात अतिवृष्टी

Rain Update : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ७९ मंडलात सोमवारी (ता. १७) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मुळधार पाऊस झाला.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ७९ मंडलात सोमवारी (ता. १७) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मुळधार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी शहर, जांब, कुपटा या ३ मंडलात अतिवृष्टी झाली. जांब (ता. परभणी) येथे झालेल्या मुसळधार पावसात झोडपल्याने १ शेळी, २ पिल्ले तसेच १ गाय दगावल्याचे वृत्त आहे. दमदार पावसामुळे खरिपाच्या पेरणीस वेग येईल.

परभणी जिल्ह्यातील ५१ मंडलात वादळी वारे, वीजांच्या कडकडात हलका ते मुसळधार पाऊस झाला. परभणी शहर, जांब, कुपटा या मंडलात अतिवृष्टी झाली. जांब मंडलात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. ओढे, नाले भरुन वाहिले. वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली.

Heavy Rain
Heavy Rain : लातूरला सहा, धाराशिवला दोन तालुक्यांत अतिवृष्टी

अनेक भागात पेरणी केलेले सोयाबीन, कपाशी आदी पीकांचे बियाणे वाहुन गेले. घरात तसेच आखाड्यावरील खते, बियाणे भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर होता. परभणी जिल्ह्यात जून मधील पावसाने १०० मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे.

Heavy Rain
Vidarbha Rain : विदर्भात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम

जिल्ह्यत गेल्या २४ तासांत सरासरी २८.८ मिमी तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी १२०.२ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडलात हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५.९ मिमी तर १ जून पासून आजवर एकूण सरासरी ८३.४ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा : परभणी ७१.५, पेडगाव ३४.५, जांब ८९, झरी २७.८,सिंगणापूर ५.८, दैठणा ११.५, पिंगळी १३.८, परभणी ग्रामीण २८.३, टाकळी कुंभकर्ण २८.३, बामणी १४.३, बोरी ३०.८, दूधगाव ३६.५, सेलू १४.५, देऊळगावगात २२.५, वालूर २०.८, कुपटा ६६.५, चिकलठाणा २९.३, मोरेगाव ३६.३, मानवत २८.३, केकरजवळा १६, कोल्हा २८.५, ताडबोरगाव ६२, रामपुरी १८, पाथरी ३२.८, बाभळगाव ३४, हादगाव २५.८, कासापुरी ४६.३, सोनपेठ ३७.३, आवलगाव ४०.५, शेळगाव ४१.५, वडगाव ५४.३, गंगाखेड २०.५, महातपुरी ३८.५, माखणी ६३.८, राणीसावरगाव ७.५, पिंपळदरी ३३.८, पालम १७.८, चाटोरी २१.३, बनवस ३०.३, पेठशिवणी ९.८, रावराजूर ४०.८, पूर्णा १४.३, ताडकळस १३.८, लिमला ३०.५, कात्नेश्वर ४८.८, चुडावा ३१.३,कावलगाव १७. हिंगोली जिल्हा : डिग्रस कऱ्हाळे ९.३, नांदापूर ११.३, वसमत ५.५, हट्टा ४३.५, टेंभुर्णी १४.८, औंढा नागनाथ १४.३, साळणा १३, जवळा बाजार २२.८, साखरा १४.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com