Heavy Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Parbhani : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ३१ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : अतिवृष्टीमुळे नाले, नद्यांना पूर आले. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. गोदावरी, दूधना, पूर्णा नद्यांना पूर आले.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत रविवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये सर्वदूर दमदार पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांतील ३१ मंडलांत अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.

अतिवृष्टीमुळे नाले, नद्यांना पूर आले. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. गोदावरी, दूधना, पूर्णा नद्यांना पूर आले. सोयाबीन, कपाशी, तूर, हळद आदी पिके पाण्याखाली गेली. जमिनी खरडून गेल्या.

परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता. २६) दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत संततधार पाऊस झाला. थांबून थांबून जोरदार सरी कोसळत होत्या. नाले, नदीला पूर आल्यामुळे मांडाखळी गावातील रस्त्यावर पाणी साचल्याने मांडाखळी ते उमरी तर रेल्वे अंडरग्राउंड पूल पुलाची भिंत कोसळल्याने पेडगाव फाटा ते गव्हा-मोहपुरी-आळंद मार्गावरील, नाल्याला पूर आल्यामुळे पिंपळगाव सय्यद मिया-वळगाव तर्फे टाकळी रस्त्यावरील वाहतुकीस बंद झाली होती.

वांगी, साटला, मांगणगाव, हिंगला, साडेगाव, धार, सोन्ना, बाभुळगाव, उजळांबा, आर्वी, इस्माईलपूर, गोविंदपूर, धसाडी, अंगलगाव, माळसोन्ना, नांदापूर, जलालपूर, पिंपळगाव ठोंबरे, सूरपिंपरी, धर्मापुरी, नांदखेडा, रायपूर, किनोळा-खरवडे ही गावे अतिवृष्टिग्रस्त झाली.

परभणी जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ५३.४ मिमी, तर जुलै महिन्यात सरासरी २२०.०९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात १ जूनपासून आजवर सरासरी ३०२ मिमी (८९.८ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यातील २२ मंडलांत अतिवृष्टी झाली.

हिंगोली जिल्ह्यातील मागील २४ तासांमध्ये सरासरी ५२.४ मिमी, तर जुलै महिन्यात आजवर सरासरी २२९.९ मिमी पाऊस झाला.१ जूनपासून आजवर सरासरी ३६१.९ मिमी (९७.९ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी झाली.

अतिवृष्टी झालेली मंडळे

परभणी जिल्हा ः परभणी ६७.३, परभणी ग्रामीण ७५.२३, पेडगाव ७३, जांब ८६, झरी ६६, सिंगणापूर ६७, पिंगळी ७५.२५, टाकळी कुंभकर्ण ७०.७५, जिंतूर ६६.५, दूधगाव ६७, देऊळगाव गात ७१, मानवत ७०.२५, कोल्हा ९५.७५, ताडबोरगाव ९५.७५, पाथरी ९३.७५, हादगाव ७८.५०, कासापुरी ८८.७५, पूर्णा ८६.२५, ताडकळस ७३.७५, कात्नेश्वर ७६, चुडावा ७७.२३, कावलगाव ७२.५.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ः जिल्ह्यातील वसमत १०५, हयातनगर १०५, गिरगाव ६६.३, हट्टा ८०.३, टेंभूर्णी १०५.३, औंढा नागनाथ ६६.३, साळणा ६५.३, जवळा बाजार ७३.८, पानकन्हेरगाव ६५.८.

मंडलनिहाय पाऊस ...

परभणी जिल्हाः दैठणा ४६, सावंगी म्हाळसा ४६.५, बामणी ६२.५, बोरी ६२.५, आडगाव ६२.५, चारठाणा ५०.५, वाघीधानोरा ६१.८, सेलू ३५.३, वालूर ३६.३, कुपटा ४१.३, चिकलठाणा ६१, मोरेगाव ३३, केकरजवळा ३६.८, रामपुरी ४६.८, बाभळगाव ३६.६, सोनपेठ १४, आवलगाव १९, शेळगाव १९, वडगाव ११.३, महातपुरी १८.३, महातपुरी १५.३, माखणी १३.५, पिंपळदरी १३.८, पालम ३९.५, चाटोरी १६.३, बनवस १६.३, पेठशिवणी ४७.३, रावराजूर ३६.३, लिमला ६४.५.

हिंगोली जिल्हा ःहिंगोली ३३, नरसीनामदेव ४२.८, सिरसम २०, बासंबा ३३, डिग्रस कऱ्हाळे ४२, खंबाळा २०, कळमनुरी २७.८, वाकोडी २९.८, नांदापूर ४६.८, आखाडा बाळापूर ३३.८, डोंगरकडा ५०.८, वारंगा ५४.५, आंबा ५१.३, कुरुंदा ५१.३, येळेगाव ४६.८, सेनगाव ५०, गोरेगाव ४२.८, आजेगाव ४२.८, साखरा ५३.८, हत्ता ४६.५.

पाऊस स्थिती...

परभणी जिल्हा:

मागील २४ तासांतील सरासरी पावसाची नोंद : ५३.४ मिमी

जुलै महिन्यातील एकूण पाऊस : २२०.०९ मिमी

१ जूनपासून एकूण : ३०२ मिमी (८९.८%)

हिंगोली जिल्हा:

मागील २४ तासांतील सरासरी पाऊस : ५२.४ मिमी

जुलै महिन्यातील एकूण पाऊस : २२९.९ मिमी

१ जूनपासून एकूण : ३६१.९ मिमी (९७.९%)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vegetable Solar Dryer: सौर ड्रायरचे प्रकार अन् क्षमता

Indian Politics: गोंधळलेले सरकार अन विरोधकही...

Maize Production: मका : समतोल धोरण हवे

Purandar Airport: हरकती घेतल्यानंतरही विमानतळासाठी जमिनी का घेता?

Chakan Market: चाकण बाजारामध्ये काशीफळाच्या मागणीत वाढ

SCROLL FOR NEXT