Akola News: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान निर्माण झालेला तांत्रिक व प्रशासकीय पेच अखेर सुटला आहे. योजनेच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी प्रत्येकवेळी कार्यालय प्रमुखांचा अंगठा (थंब) आवश्यक असल्यामुळे महसूल व कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर जाणे कठीण झाले होते. या अडचणीबाबत ‘ॲग्रोवन’ने २० फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत सुधारणा केल्या आहेत..पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कृषी विभागाची प्रमुख भूमिका आहे. या योजनेतील सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडतात. मात्र पोर्टलवरील कामकाजासाठी प्रत्येक वेळी संबंधित कार्यालय प्रमुखांचा अंगठा आवश्यक करण्यात आल्यापासून जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी कार्यालयातच अडकून पडत होते. परिणामी क्षेत्रभेटी, शेतकरी संपर्क तसेच इतर प्रशासकीय कामांवर परिणाम होत होता. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या अधिक तीव्र झाली होती..Kisan Samman Nidhi Hike: बिहारमधील ७३ लाख शेतकऱ्यांना मोठी भेट, वर्षाला ६ हजार ऐवजी ९ हजार मिळणार.या अडचणीबाबत काही अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तालयाच्या बैठकीतही मुद्दा मांडला होता. मात्र त्यावर तातडीने निर्णय होत नव्हता. ‘अॅग्रोवन’मध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने दखल घेत कार्यपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला..PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांना आज मिळणार ४२ हजार कोटींची भेट.नव्या निर्णयानुसार, कृषी विभागात जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांऐवजी त्याच कार्यालयातील कृषी उपसंचालकांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांऐवजी कार्यालयातील सांख्यिकी उपकृषी अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. .महसूल विभागात जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी निवासी उपजिल्हाधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदारांऐवजी निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे योजनेच्या ऑनलाइन पोर्टलवरील कामकाजासाठी पूर्वीच्या यूजर आयडी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी अधिनस्त अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.