Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Monsoon Rain : मालेगाव तालुक्यातील वडनेर, कळवाडी, सटाणा तालुक्यातील नामपूर, टेंबे खालचे, नांदगाव तालुक्यातील मनमाड, हिसवळ या महसूल मंडळात तर इगतपुरी सर्वदूर पावसाचा जोर होता.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Nashik News : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटमाथ्यावर मुसळधार व अति मुसळधार पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. इगतपुरी, नाशिक व दिंडोरी तालुक्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

शनिवार (ता. २६) रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे सर्वाधिक ९५ मिमी पावसाची नोंद झाली. तर मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण व झोडगे महसूल मंडळात अनुक्रमे ८८ व ८० मिमी व नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव, न्यायडोंगरी येथे येथे अनुक्रमे ८० व ८२ मिमी पावसाची नोंद झाली.

सुरुवातीला पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी,त्र्यंबकेश्वर व पेठ या तालुक्यांमध्ये तर नंतर मालेगाव, नांदगाव, बागलाण, सुरगाणा, नाशिक व येवला तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

Rain
Jalna Rain : जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक

मालेगाव तालुक्यातील वडनेर, कळवाडी, सटाणा तालुक्यातील नामपूर, टेंबे खालचे, नांदगाव तालुक्यातील मनमाड, हिसवळ या महसूल मंडळात तर इगतपुरी सर्वदूर पावसाचा जोर होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यातील दारणा, वालदेवी, वाकी, भाम व भावली या धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येत आहे.यामध्ये दारणा धरणातून सर्वाधिक ७,८०६ क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

Rain
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

जिल्ह्यातील मोठ्या ७ व मध्यम १९ अशा एकूण २६ धरण प्रकल्पात(ता.२६ अखेर) ५२,२९७ दलघफु इतका पाणीसाठा असून ही टक्केवारी ७४.०५ टक्के इतका आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

धरण विसर्ग(क्युसेक्स)

दारणा ७८०६

वालदेवी २४१

आळंदी २४३

भावली ९४८

भाम २३२७

वाकी ९२४

करंजवन १००

कडवा २४५८

चणकापुर १४०

हरणबारी १७३

केळझर ७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com