Pune Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Warna Dam Water : शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सद्यस्थितीला धरणातून १४ हजार ८८० क्युसकने विसर्ग सुरु आहे. गेल्या चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रात ४८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सलग दुसऱ्यादिवशाही पावसाने हजेरी लावली. मिरज, जत, वाळवा, पलूस, कडेगाव, विटा, खानापूर या भागात हलका पाऊस झाला. तर दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात रिमझिम पाऊस पडला. शिराळा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कमी अधिक आहे. गेल्या चोवीस तासात १५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्याने वारणा धरणात पाणी पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्गही वाढवला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ झाली आहे. वारणाकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चरण व सागाव येथील स्मशानभूमीत वारणा नदीचे पाणी शिरले आहे. वारणा काठची पिके पाण्याखाली गेली आहेत.आरळा-शित्तूर व चरण-सोंडोली पुलास पाणी लागले आहे. मांगले -सावर्डे ,कोकरूड-वारणा रेठरे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर १९४९ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ झाली आहे.

धरणातून सुरू असलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)

कोयना धरणातून ३१७४६, धोम ७१३७, कण्हेर ४२९०, धोम बलकवडी ७४०, उरमोडी ५००, तारळी ३५४९, राधानगरी ४३५६, दुधगंगा ३६००, तुळशी १००, कासारी ९००, पाटगाव १२२८ व अलमट्टी धरणातून १ लाख २० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Politics: सामूहिक अभयदान योजना

Farmer Struggles: महाग कृषी निविष्ठांमुळे केळी बागायतदार जेरीस

Pune Forest Tourism: पुणे जिल्ह्यातील वनपर्यटनात क्षमता मोठ्या: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Kharif Sowing: राज्यात खरीप पेरा अंतिम टप्प्यात

Code of Conduct Violation Case: मोदींवर आचारसंहिता भंगप्रकरणी  कारवाईस आयोगाची टाळाटाळ

SCROLL FOR NEXT