National Cooperative Sugar agrowon
ॲग्रो विशेष

National Cooperative Sugar : पन्नास वर्षांत पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचे वर्चस्व, हर्षवर्धन पाटील नवे अध्यक्ष

Harshvardhan Patil : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Harshvardhan Patil Maharashtra : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपचे वर्चस्व मिळाले आहे. तर हर्षवर्धन पाटील यांच्या निवडीने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे सहकार मंत्रीपद भूषवले होते. त्या अनुभवाचा विचार करून त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. सहकार क्षेत्रात सर्वपक्षीय नेते सक्रिय असून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यासारख्या संस्थांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या संस्थांची वाटचाल सुरू आहे. परंतु या संस्थांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट, कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते विविध पदे भूषवत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतरही दिलीप वळसे पाटील, अजित पवार या संस्थांच्या कामकाजात शरद पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसत असल्याचे चित्र दिसते. तसेच हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी नेत्यांनी छावण्या बदलून भाजपचा आश्रय घेतल्यानंतरही त्यांचे या संस्थांतील स्थान कायम राहिले आहे. तसेच भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यासुध्दा या संस्थांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या ताज्या निवडीकडे पक्षीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, असे मत सहकार क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

दुसऱ्या बाजूला या नेमणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील यांचे भाजपने पुनर्वसन केले असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेला बारामती मतदारसंघातून पाटील यांना तिकीट मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याला पूर्णविराम मिळाल्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने त्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली. परंतु तिथेही निराशा पदरी पडल्यानंतर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून पाटील यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, असे मानले जात आहे. पाटील कॉंग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर त्यांना भाजपमध्ये विशेष महत्त्वाचे असे कोणतेही पद देण्यात आले नव्हते. साखर कारखानदारीच्या संदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळांत त्यांचा समावेश आवर्जून केला जाई.

या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याबद्दल पाटील यांनी अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ते आज (ता. १६) दुपारी शाह यांची भेट घेणार आहेत.

पाटील यांच्या निवडीच्या माध्यमातून भाजपला ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघावर आपला झेंडा फडकावता आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र जास्त आहे. येथे साखर कारखानदारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. येथील राजकीय क्षेत्रावर सहकाराच्या राजकारणाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्थेच्या कारभाराची सूत्रे पाटील यांच्या हाती जाण्याला एक वेगळे महत्त्व आहे.

महासंघाचे कार्यालय नवी दिल्ली येथे असून देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे, तसेच साखर उद्योगांपुढील अडचणी केंद्र सरकारकडे मांडणे, केंद्राकडे पाठपुरावा करून साखर कारखानदारीच्या प्रश्नांची तड लावणे आदी कामे महासंघाच्या माध्यमातून केली जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop in Crisis : विदर्भात पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात

Fishing Crisis : मत्स्यदुष्काळामुळे रोजंदारीच संकटात

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

SCROLL FOR NEXT