Delhi Farmers Protest : शेतकऱ्यांसोबत तिसरी बैठकही फेल ; शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम

Delhi Chalo Protest Update : केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. हमीभावा कायद्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
Delhi Farmers Protest
Delhi Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Farmers Protest Latest Update : केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. हमीभावा कायद्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारही अॅक्शनमोडवर आले आहे.

चंडीगड येथे काल रात्री उशीरा शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये तिसऱ्यांदा चर्चा झाली. मात्र, चर्चेतून आंदोलन थांबिवण्याबाबत एकमत झाले नाही. परिणामी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे.

केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये गुरूवारी रात्री चंडीगड येथे झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर कायम असून सरकारने ठोस घोषणा करण्यावर ठाम आहेत.

काल झालेल्या बैठकीत पीयूष गोयल, अर्जून मुंडा आणि नित्यानंद राय हे बैठकीसाठी उपस्थित होते. तर, शेतकऱ्यांच्यावतीने १५ संघटनांचे नेते उपस्थित होते. या बैठकीतही आंदोलनासंदर्भात कोणताही मार्ग निघू शकला नाही. याबाबत पुढील शेतकऱ्यांसोबत पुढील चर्चा रविवारी १८ फेब्रूवारीला सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

Delhi Farmers Protest
Delhi Farmer Protest : दिल्लीत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा

शेतकरी संघटनांसोबतच्या बैठकीपूर्वी चंडीगडच्या ताज हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी संघटनांचे कोणतेही नेते उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री मान यांच्यासह या बैठकीला पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा हे सुध्दा उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री शेतकरी संघटनांच्या बैठकीसाठी निघाले.

Delhi Farmers Protest
Delhi Farmers Pretest : शेतकऱ्यांच्या मागण्यांना 'आरएसएस' प्रणित शेतकरी संघटनेचा पाठिंबा; मात्र हिंसा समर्थनीय नाही

देशातील सर्वाधिक दर

दरम्यान, शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सरकारच्यानतीने केंद्रीय मंत्र्यानी बाजू मांडली. त्यात त्यांनी हमीभावाचा कायदा रातोरात होवू शकत नाही. यासाठी वेळ लागतो, असे त्यानी म्हटले. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या गहू आणि तांदळाची हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. या दोन राज्यांमध्ये ऊस आणि कापसाला देशातील सर्वाधिक दर मिळतो. असे असतानाही येथील शेतकरी सर्व पिकांच्या मागणीसाठी आग्रही आहे.

'हे' शेतकरी नेते आंदोलनापासून दूर

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आंदोलनापासून शेतकरी संघटनांचे नऊ नेते दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये योगेंद्र यादव, गुरनामसिंग चढुनी, बलबीर सिंग राजेवाल, मनजीत राय, डॉ. दर्शनपाल, शिवकुमार कक्का, जगिंदरसिंग उग्रहान, राकेश टिकैत, डॉ. एम. व्ही. सिंग यांचा समावेश आहे. मात्र, गुरूनामसिंग चढुनी यांच्या संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com