Sugarcane Season : साखर कारखान्यांचा मनमानी कारभार अन् वशिलेबाजीला वैतागलेला शेतकरी तोडणीसाठी लावतोय उभ्या उसाला काडी

Sugarcane Schedule : ऊस तुटत नसल्याने कारखाना प्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांकडे शेतकरी वशिलेबाजी करताना दिसत आहेत.
Sugarcane Season
Sugarcane Seasonagrowon
Published on
Updated on

Sugarcane Season Extend : राज्यात यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला परंतु कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन आणि अवकाळी पावसामुळे ऊसतोडी लांबल्या. दरम्यान याचा थेट परिणाम कारखान्यांच्या ऊस तोडणी वेळापत्रकावर झाला आहे. यामुळे सध्या ऊस तुटत नसल्याने कारखाना प्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांकडे शेतकऱ्याकडून वशिलेबाजीवर ऊसतोड करण्यासाठी जोडणा लावण्याचे काम सुरू आहे.

याचा गैरफायदा घेत कारखान्याचे कर्मचारीही शेतकऱ्यांकडून एकरी ३ ते ५ हजार रुपयांची उघडउघड मागणी करत असल्याचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात होताना दिसत आहे.

अशातच मागच्या वर्षी पावसाचे अत्यंत कमी प्रमाण राहिल्याने विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठल्याने उभा ऊस पेटवून देत ऊस घालवण्याचा आटापिटा शेतकऱ्याकडून केला जात आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने शेतकऱ्यांनी ऊस तोडीसाठी गडबड करू नये, असे आंदोलनाच्या काळात सांगितले जात होते.

तब्बल तीन आठवडे ऊस दराचे आंदोलन सुरू होते. ऊस दराचे आंदोलन संपते न संपते तोच अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आणखीन पंधरा दिवस हंगाम पुढे गेला. अशा स्थितीत साखर कारखान्याचे ऊस तोडणीचे वेळापत्रक कोलमडले.

Sugarcane Season
Sugarcane Harvesters : सरकारची फक्त घोषणाच ऊस तोडणी यंत्रधारकांना अद्यापही अनुदानाची प्रतीक्षा

परंतु ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी शेतकरी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालक आणि कर्मचाऱ्यांचा पिच्छा पुरवत ऊस तोडीसाठी शेतकरी त्यांचे उंबरे झिजवत आहेत. उसाला तोड येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांकडून उभा ऊस पेटवला जात आहे. शेतकऱ्यांचे यात नुकसान होत आहे. उसाला लवकर तोड येईल याची खात्री नसल्याने शेतकरी जड अंतःकरणाने ऊस पेटवून देत आहेत.

अनेक गावांमध्ये आडसाली उसापूर्वी खोडवा उसाला तोड दिली जात आहे. कारखान्यांकडून वशिलेबाजीवर ऊस तोड सुरू असल्याच्या भावनेतून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कारखाना कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उ‌द्भवत आहेत.

टंचाईची भीती शेतीच्या मुळावर

संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात भाजीपाला क्षेत्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. यातच आता ऊस तोडीसाठी शेतकरी नुकसान सोसायलाही तयार झाला आहे. संभाव्य पाणी टंचाईची भीती शेतीसाठी धोक्याची ठरत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com