Soybean Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Worm Infestation : सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

Worm Infestation : चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा मंडलाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सोयाबीन व मक्यावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Team Agrowon

Amravati News : चिखलदरा तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा मंडलाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सोयाबीन व मक्यावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकाचे कोवळे नवांकुर अळीद्वारे फस्त केले जात असून, २१० हेक्टरवरील पीक अळीच्या विळख्यात सापडल्याचे निरीक्षण कृषी विभागाने नोंदविले आहे.

आधीच कर्जाच्या ओझ्याखाली आलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे करून सोयाबीन व मका या नगदी पीक समजल्या जाणाऱ्या पिकांची पेरणी केली. जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे मृग नक्षत्रात सुरुवातीला बरसलेल्या पावसाचा याला आधार ठरला. त्यातही काहींच्या पेरण्या खोळंबल्या तर काहींच्या बऱ्यापैकी साधल्या गेल्या.

अशातच आता सोयाबीन चार ते सहा पानांवर येत नाही तोच केसाळ अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन व मका या पिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एका झाडावर ८ ते १० केसाळ अळ्या असून काही मिनिटांतच ते झाडाची पाने खाऊन फस्त करीत आहेत. टेम्ब्रुसोंडा मंडलातील सोनापूर, मोरगढ, वाकी, रुईपाठा, बहादरपूर, चांदपूर व जामली (आर) परिसरांतील शिवारात बाधित क्षेत्र सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले. तब्बल २१० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर अळ्यांचा प्रादुर्भाव असल्याचे प्राथमिक निरीक्षण कृषी विभागाकडून नोंदविण्यात आले आहे.

अशा करा उपाययोजना...

ज्या शेतात सूर्यफूल पीक घेतले आहे, त्या शेतात सोयबीन घेणे टाळावे. शेताच्या कडेला सापळा पीक म्हणून सूर्यफूलाची लागवड करावी. अंडी-अळी असलेली पाने नष्ट करावीत. शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. प्रकाश सापळ्यांचा वापर करून पतंग नष्ट करावेत. हेक्‍टरी १५ ते २० पक्षी थांबे लावावेत.

प्रतिबंधात्मक उपायांसाठी पाच टक्‍के निबोंळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव कमी असल्यास जैविक घटकांची तर प्रादुर्भाव अधिक असेल तर शिफारसीप्रमाणे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी दिला आहे.

मेळघाटात जंगलाला लागूनच शेती आहे. त्यामुळे हेअरी कॅटरपिलर जो प्रकार आहे अळीचा, तो पिकावर हल्ला चढवतो. बाधित क्षेत्राचे प्राथमिक सर्वेक्षण कृषी सहाय्यकामार्फत केले आहे. यासाठी दुर्गापूर, घातखेडा या दोन केव्हिकेसह प्रादेशिक संशोधन केंद्राच्या तज्ञांना पाहणीसाठी कळविले आहे.
एल. जी. आडे, तालुका कृषी अधिकारी, चिखलदरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT