Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Crop Damage : गारपिटीने अडीच हजार हेक्टरला फटका

Unseasonal Rain Update : अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना फटका बसला.

Team Agrowon

Yavatmal News : अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांना फटका बसला. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर तसेच संत्रा आदी अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसाने गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांचा पाठलाग कायम ठेवला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. कापूस, सोयाबीन पिकांना फटका बसला. अतिपावसामुळे पिकांची वाढ खुंटली. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. दोन्ही पिकांची सरासरी घटली आहे.

त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाने कापसाने नुकसान केले. शेतात कापूस असताना आलेल्या पावसाने कापूस ओला झाला. परिणामी भावात घसरण झाली आहे. सध्या बाजारात कापूस तसेच सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण सुरुच आहे. रब्बी हंगामात नुकसान भरुन निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

मात्र, अवकाळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. शनिवारी (ता. ११) बाभूळगाव तालुक्यातील १७ गावांत गारपीट तसेच पाऊस झाला. यामुळे हरभरा, गहू, तूर तसेच संत्रा या पिकांचे नुकसान झाले आहे. या सतरा गावातील दोन हजार ४९४ हेक्टरवरचे पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गारपीट, पावसानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. बाभूळगाव तालुक्यासह इतर काही भागात हलका पाऊस झाला. त्यात फार नुकसान झाले नसले तरी अजूनही अवकाळीचा धोका शेतकऱ्यांना आहे. मुबारकपूर, सावंगी, वडगाव, घारफळ, सिंदी, वरुड, गवंडी, सारफळी, किन्ही, खर्डा, गोंधळी, सरुळ, परसोड, येंरडगाव, तांबा, कोळा तसेच फत्तेपूर या गावात सर्वाधीक नुकसान झाले आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT