Crop Damage : गारपीट, पावसाने जिल्ह्यात बारा हजार हेक्टरवर नुकसान

Unseasonal Rain : मागील आठवड्यात चार दिवस झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्यात सुमारे ११ हजार ९५६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nagar News : मागील आठवड्यात चार दिवस झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीमुळे जिल्ह्यात सुमारे ११ हजार ९५६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. १० तालुक्यांतील २५१ गावांमधील २१ हजार ६८३ शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. झालेले नुकसान हे १७ कोटी ८० लाख रुपयांचा चुराडा झाला आहे.

नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपीट झाली. त्यामुळे कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, तूर, कांदा तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांमध्ये दहा तालुक्यांत २१ हजार ६८३ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

Crop Damage
Grape Crop Damage : राज्यात द्राक्षाचे सुमारे ९ हजार कोटींचे नुकसान

यात ४ हजार २६८ जिरायती पिकांचे ५ हजार ६७४ हेक्टरवरील बागायत पिकांचे आणि २ हजार १२ हेक्टरवर फळबागांचे नुकसान झालेले आहे. यासह जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या पिकांचे क्षेत्र आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

मात्र शासनाकडून मॉन्सूनोत्तर पावसात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित पिकांना भरपाई देण्यात येत असल्याने नुकसानीच्या अंतिम अहवालात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान असणाऱ्या तालुक्यांची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चार उपविभागांतील दहा तालुक्यांत नुकसान झालेल्या पिकांचे क्षेत्र आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक बाधित क्षेत्र पारनेर तालुक्यातील १० हजार ४५२ हेक्टर असून, ४९ गावांत तडाखा बसलेला आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : नगर जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडलांत जोरदार पाऊस

नुकसानीत अकोले तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६५ गावांतील २ हजार ४४५ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झालेले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील ५७ आणि जामखेड तालुक्यातील ५७ गावांत, तसेच संगमनेरच्या ११, राहात्यामधील ६ गावांत आणि नेवाशातील ५ गावांत मॉन्सूनोत्तर, गारपीट आणि वादळी पावसाचा तडाखा बसलेला आहे.

नुकसान झालेले क्षेत्र (कंसात शेतकरी)

नगर ः १.२० (५), पारनेर ः ६५४३ (१०,४५२) पाथर्डी ः २ (५), जामखेड ः ३१६२ (६३३०), श्रीगोंदा ः १३६० (२,२३२), श्रीरामपूर ः ०.१०० (१), नेवासा ः ९.४० (१४), संगमनेर ः ९४ (१५४), अकोले ः ७५५.४६० (२,४४५), कोपरगाव ः ५.४०० (११), राहाता ः २१.४०० (३४).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com